WEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद

WEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद

पुण्यामध्ये काल रात्री महाबळेश्वरपेक्षाही तापमान कमी होतं. शिवाजी नगर केंद्रामध्ये रात्री 13.9 अंशांची नोंद केली गेली.

  • Share this:

पुणे, 13 नोव्हेंबर : राज्यात मुंबई आणि कोकण वगळता सर्वत्र थंडी जाणवू लागली आहे. नागपूरमध्ये काल पारा 11.4 अंशांवर घसरला होता. विदर्भात बहुतांश ठिकाणी रात्री आणि पहाटे तापमान 12 ते 14 अंशांच्या घरात असतं. या आठवड्यात अशीच थंडी राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

पुण्यामध्ये काल रात्री महाबळेश्वरपेक्षाही तापमान कमी होतं. शिवाजी नगर केंद्रामध्ये रात्री 13.9 अंशांची नोंद केली गेली. त्याचवेळी महाबळेश्वरचं तापमान 15.6 अंश सेल्सियस होतं. नाशिकमध्ये काल 12.2 अंश तर औरंगाबादमध्ये 13 अंश तापमान होतं.

परभणीमध्ये सलग तिसऱ्या दिवाशी तापमानात घट झाली आहे. परभणीचे तापमान 9.5 अंशावर आहे. त्यामुळे सर्वत्र थंडीची लाट कायम आहे. यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची आज नोंद करण्यात आली आहे.

मुंबईमध्ये थंडीची चाहूल लागली असली तरी मुंबईकरांना मात्र थंडीसाठी अजून काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे मुंबईचं वातावरण अजून काही दिवस उष्ण राहणार असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेनं दिली आहे.

राज्यात थंडीचा जोर वाढत असला तरी, मुंबई आणि पश्चिमेकडील समुद्र किनाऱ्यांलगतच्या भागात अजुनही उष्णतेचं प्रमाण अद्याप कमी झालेलं नाही. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याने आणखी काही काळ थंडी लांबणीवर जाणार आहे. एकंदर परिस्थितीमुळे मुंबईकरांना गरमीच्या वातावरणातून सुटका होण्यासाठी डिसेंबर महिना उजडावा लागणार की काय? असा प्रश्न पडला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे मुंबईचं वातावरण अजून काही दिवस उष्ण राहणार असल्याची माहिती कुलाबा वेधशाळा संचालिका शुभांगी भुते यांनी न्यूज18 लोकमतला दिली.

VIDEO : जेव्हा इंटरनेटवर लीक झाला बाहुबलीच्या देवसेनेचा MMS...

First published: November 13, 2018, 10:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading