Elec-widget

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी तीव्रतेच्या वादळामुळे 16 ते 19 डिसेंबरदरम्यान विदर्भात हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्याता हवामान विभागानं वर्तवलीय.

  • Share this:

मुंबई, 15 डिसेंबर : श्रीलंकेच्या पूर्व किनाऱ्यालगत तयार झालेलं कमी तीव्रतेचं चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे सरकत आहे. त्याचा जोर आणखी वाढला असून, लवकरच ते तमिळनाडूलगतच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या वादळामुळे 16 ते 19 डिसेंबरदरम्यान तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगडमध्ये मुसळधार तर विदर्भात हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्याता हवामान विभागानं वर्तवलीय.

भारताच्या पूर्व किनारपट्टीवर सरकत असलेल्या कमी तीव्रतेच्या (डीप डीप्रेशन) या वादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा ढगाळी हवामान तयार झालंय. याचाच परिणाम शुक्रवारी आणि शनिवारी कोकण आणि गोव्यात पहायला मिळाला. कोकण आणि गोव्यात अनेक ठिकाणी हलक्या आणि मध्याम स्वरुपाचा पाऊस झाला. 15 दिवसांपूर्वी असच ढगाळ हवामान तयार झाल्यामुळे कोल्हापूर, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली आणि राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. आकाश निरभ्र होता परत थंडीचा जोर वाढल्याने महाबळेश्वरचं पारा 7 अंशाखाली आला होता. तो शनिवारी परत 13 अंशावर गेला. कोकण, गोव्यासह राज्यात जवळपास सर्वच ठिकाणच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे.

येत्या 48 तासाच राज्याच्या किमान तापमानात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शनिवारी (ता. 15) जळगाव येथे राज्यातील नीचांकी १०.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 19 डिसेंबरपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तर कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


शनिवारी राज्यातील विविध ठिकाणचं किमान तापमान असं होतं..

Loading...

मुंबई (कुलाबा) 23.0

मुंबई (सांताक्रूज) 22.6

अलिबाग 22.4

रत्नागिरी 24.2

पणजी (गोवा) 22.1

डहाणू 18.5

पुणे 15.0

अहमदनगर -

जळगाव 10.3

कोल्हापूर 18.7

महाबळेश्वर 13.0

मालेगाव 13.8

नाशिक 10.6

सांगली 17.9

सातारा 18.4

सोलापूर 19.2

उस्मानाबाद -

औरंगाबाद 15.6

परभणी 14.5

नांदेड 16.0

नागपूर 12.3

अकोला 12.5

अमरावती 14.2

बुलडाणा 13.4

ब्रम्हपूरी 12.7

चंद्रपूर 16.6

गोंदिया 12.4

वाशिम 13.6

वर्धा 14.5

यवतमाळ 14.0


VIDEO : पैशांचा असा पाऊस तर तुम्ही कधीच पाहिला नसेल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2018 07:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...