24 तासांत 'या' शहरांत वादळी पाऊस, पेरणीची घाई न करण्याचा सल्ला

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज दुपारी वादळी पाऊस पडेल असा अंदाज हवामनान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2019 03:39 PM IST

24 तासांत 'या' शहरांत वादळी पाऊस, पेरणीची घाई न करण्याचा सल्ला

मुंबई, 22 जून : सध्या सगळा देश मान्सूनच्या प्रतिक्षेत आहे. केरळमध्ये पावसाने हजेरी लावल्यानंतर आता महाराष्ट्रातल्या अनेक भागांत मान्सून बरसण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भातही मान्सूनचं आगमन झालं आहे. त्याचबरोबर चंद्रपूर, गडचिरोलीमध्येही पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाचं आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला असं म्हणायला हरकत नाही.

येत्या 24 तासात मान्सून नागपूरात पोहचण्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. नागपूरातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या. तर सध्या अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. राज्यात आज दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज दुपारी वादळी पाऊस पडेल असा अंदाज हवामनान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. मान्सूनची आता विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. 22 ते 25 जून दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बऱ्याच भागात आज दुपारनंतर वादळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता कमी आहे. 26 तारखेनंतर या सर्व भागांमध्ये पावसात परत एकदा खंड आढळून येईल जो किमान आठवडाभर तरी राहणार असल्याचं मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि 26 नंतर पावसात पडणाऱ्या खंडाच्या अंदाजानुसारच पेरणी संबंधी निर्णय घ्यावा, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचा : सिडकोच्या 90 हजार घरांच्या लॉटरीचा मुहूर्त ठरला, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

Loading...

नागपूरमध्ये पाणीटंचाईचं संकट

जून महिन्यात तिसऱ्या आठड्यातदेखील नागपूर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झालं नसल्यानं पाणीटंचाईचे संकट वाढलं आहे. या परिस्थितीमुळे शहरात पाणी समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. आगामी 10 दिवसात जर पुरेसा पाऊस आला नाही तर मध्य प्रदेशातील चौराई धरणातून पाणी सोडण्यासाठी चर्चा करणार असल्याचं राज्य सरकारनं सांगतिलं आहे.

मध्य प्रदेशातील चौराई धरणामध्ये 90 टक्के पाणीसाठा आहे. शिवाय धरणाचे कालवे तयार झाले नसल्याने हे पाणी मध्य प्रदेशच्या काही कामाचे नाही. त्यामुळे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासोबत लवकरच राज्य सरकार बोलणार असल्याचं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे.

सध्या नागपूरला पेंच प्रकल्पातील डेड स्टाँकमधून पाणीपुरवठा सुरू आहे. शिवाय नागपूर जिल्ह्यातील संत्री उत्पादक ज्या शेतकऱ्यांच्या संत्री बागेतील झाडं वाळून गेली आहेत. त्यांना प्रती झाड मदत देणार असल्याचंही पालकमंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी सांगितलं आहे.

रेल्वे कर्मचाऱ्याला WWE स्टाईलने चोपला, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2019 03:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...