बुलबुल चक्रीवादळ घेणार रौद्र रुप, मुंबईसह इतर शहरांत पावसाची शक्यता

बुलबुल चक्रीवादळ घेणार रौद्र रुप, मुंबईसह इतर शहरांत पावसाची शक्यता

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या काही तासांत चक्रीवादळ बुलबुल तीव्र होऊन उत्तरेकडे जाईल. त्यानंतर हे वादळ ईशान्य दिशेने जाईल आणि पश्चिम बंगाल ओलांडेल.

  • Share this:

मुंबई, 09 नोव्हेंबर : बंगालच्या उपसागरामध्ये आलेलं 'बुलबुल' हे चक्रीवादळ ओडिशाहून पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाकडे पुढे सरकत आहे. हे वादळं तिव्र स्वरुपाचं असेल अशी शंका हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या काही तासांत चक्रीवादळ बुलबुल तीव्र होऊन उत्तरेकडे जाईल. त्यानंतर हे वादळ ईशान्य दिशेने जाईल आणि पश्चिम बंगाल ओलांडेल. हे वादळ पुढे सरकरत बांगलादेशातील सागर बेट आणि खेपुपाराच्या दरम्यानच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.

यामुळे किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस आणि ताशी 135 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचे प्रादेशिक संचालक जी.के. दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वादळामुळे राज्यात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे दळणवळ सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे तर पिकांवरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागलीच पिकाची शक्य तेवढी काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

'बुलबुल' या शक्तिशाली वादळामुळे कोलकाता विमानतळाच्या कामकाजावर बंदी घालण्यात आली आहे. 6 नोव्हेंबरपासून विमानतळ बंद करण्यात आलं आहे अशी माहिती गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. रविवारी पहाटे चक्रीवादळ 'बुलबुल' पश्चिम बंगाल आणि बांगलादेश दरम्यान समुद्रकिनारी येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस आणि ताशी 135 किमी वेगाने वारे येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने ही माहिती दिली.

मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाच्या सरी

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 9 नोव्हेंबरला मुंबईसह पालघर आणि रायगडमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल. तर काही भागांत ढगाळ वातावरण असेल. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्येही हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. पण रविवारपासून मात्र राज्यात कोरडं हवामान असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

"महा" चक्रीवादळ वादळ कमी झाल्याने शुक्रवारी मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस पडला. शुक्रवारी सकाळी घाटकोपर, चेंबूर, सांताक्रूझ, बोरिवली, कांदिवली आणि मलाड उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा फटका बसला. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी आणि गारांचा वर्षाव झाला. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सखल भागात पाणी साचलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यात डहाणू, चिंचणी, बोईसर, साफळे आणि केळवे या गावात मुसळधार पाऊस झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2019 07:11 PM IST

ताज्या बातम्या