• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • Weather Update: कोकणात होणार पावसाची वापसी? पुणे-साताऱ्यात IMD कडून हाय अलर्ट

Weather Update: कोकणात होणार पावसाची वापसी? पुणे-साताऱ्यात IMD कडून हाय अलर्ट

Weather Forecast: पुढील तीन ते चार तासांत पुण्यासह दहा जिल्ह्यांत जोरदार पाऊस धडकणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे.

 • Share this:
  पुणे, 30 जुलै: मागील तीन चार दिवसांपासून राज्यात पावसानं (Rain) दडी मारली आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची (Cloudy Weather) नोंद करण्यात येत आहे. पण त्याठिकाणी अपेक्षित सरी कोसळत नाहीत. पण पुढील तीन ते चार तासांत पुण्यासह दहा जिल्ह्यांत जोरदार पाऊस धडकणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे. आज हवामान खात्यानं दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला असून याठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. आज सकाळपासून अरबी समुद्रासह राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान आहे. त्यामुळे खूपच कमी ठिकाणी आज सूर्य दर्शन झालं आहे. शिवाय वातावरणात गारवा वाढला आहे. पुढील तीन ते चार तासांत रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, औरंगाबाद आणि जालना याठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे. हेही वाचा-Coronavirus: कसा तयार होतो कोरोनाचा नवा व्हेरिएंट? शास्त्रज्ञांनी केला खुलासा आज पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील काही तासांत याठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त आज मुंबई, नाशिक, कोल्हापूरसह कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केली केला आहे. त्यामुळे याठिकाणी आज हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. हेही वाचा-मुंबईत लसीकरणाची नवी मोहिम, आजपासून पालिकेकडून चाचणीला सुरुवात कोकणात पावसाची होणार वापसी? मागील चार-पाच दिवसांपासून कोकणात पावसाचा जोर कमी झाला आहे. यानंतर आज पुन्हा कोकणात सर्वत्र येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मान्सून वापसीचे संकेत मिळत आहेत. पण तूर्तास हीच स्थिती पुढील काही दिवस राहण्याची शक्यता आहे.
  Published by:News18 Desk
  First published: