हिंमत असेल तर वेगळे लढा,आम्ही एकत्र लढून 200 जागा जिंकू-चंद्रकांत पाटील

हिंमत असेल तर वेगळे लढा,आम्ही एकत्र लढून 200 जागा जिंकू-चंद्रकांत पाटील

'काँग्रेस राष्ट्रवादीने सत्ता असताना चांगले रस्ते बांधले नाहीत आणि आता सत्ता गेल्यावर खड्डे विथ सेल्फी काढत आहेत'

  • Share this:

पुणे, 12 सप्टेंबर : हिंमत असेल तर 2019 ला वेगळे लढा, 80 जागावरून 40 वर याल, पण आम्ही भाजप-सेना एकत्र लढून 200 जागा जिंकू असं आव्हानच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिलं.

पुण्यातील खडकवासला भागात 202 कोटींच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रा आणि राष्ट्रवादीच्या सेल्फीविथ खड्याचा समाचार घेतला.

काँग्रेस राष्ट्रवादीने सत्ता असताना चांगले रस्ते बांधले नाहीत आणि आता सत्ता गेल्यावर खड्डे विथ सेल्फी काढत आहेत. त्यांच्याकडे काही काम नाही म्हणून हे करताय असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

आमचं सरकार 10 वर्षे खड्डे न पडणारे रस्ते बांधत आहे तर या रस्त्यांवर टोल लागणार असा बुद्धीभेद विरोधक करत आहेत. जनसंघर्ष यात्रा काढत आहेत. कारण हे घाबरले आहेत म्हणून एकत्र येत आहेत. हिम्मत असेल तर 2019 ला वेगळे लढा, 80 जागावरून 40 वर याल असा टोला पाटील यांनी लगावला.

तसंच भाजप आणि शिवसेना एकत्र लढून 200 जागा जिंकून येईल असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला.

या कार्यक्रमानंतर 2030 पर्यंत टोल मुक्ती नाही यावर बोलताना, पाटील म्हणाले की, चार वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य रस्ते महामंडळ यांनी बांधलेल्या रस्त्यांवर टोल मुक्ती झाली आहे असं सांगितलं. परंतु, मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील टोल मुक्तीबाबत मात्र पाटील यांनी बोलण्यास नकार दिला.

VIDEO : आतापर्यंत कधी न पाहिलेले धावत्या रेल्वेखाली तरुणाचा भयंकर स्टंट

First published: September 12, 2018, 6:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading