News18 Lokmat

महाराष्ट्राचं पाणी गुजरातला? राज ठाकरेंच्या टीकेनंतर मनसे नेत्याची याचिका

तब्बल 1330 दशलक्ष घन मीटर पाणी कच्छ आणि सौराष्ट्रकडे वळवण्याचा हा प्रस्ताव म्हणजे राज्यात पाण्याची कमतरता असतानाही लोकांच्या हक्काचं पाणी पळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नितीन भोसले यांनी केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 15, 2019 04:12 PM IST

महाराष्ट्राचं पाणी गुजरातला? राज ठाकरेंच्या टीकेनंतर मनसे नेत्याची याचिका

नाशिक, 15 एप्रिल : गुजरातला पाणी देण्यावरून राज्य सरकार जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी जाहीर सभेमध्ये केला होता. त्यावर आता मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळते. कारण मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

पुन्हा एकदा महाराष्ट्राचं पाणी गुजरातला सोडलं जाण्याचा विषय ऐरणीवर आला आहे. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करत जल आराखड्याआधीच प्रकल्प अहवाल तयार केल्याचा नवा आरोप भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे महाराष्ट्र पाण्यासाठी तहानलेला असताना पाणी खरंच गुजरातला देणार का? अशा चर्चांना उधान आलं आहे.

'एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ देणार नाही' ही राज्य सरकारची फक्त वलग्ना असून 1 एप्रिललाच गुजरातला पाणी सोडण्याचं प्रस्तावित करण्यात आल्याचंही भोसले यांचं म्हणणं आहे. नार-पार, तापी, नर्मदा, दमनगंगा, पिंजाळ या नद्यांतून तब्बल 1330 दशलक्ष घन मीटर पाणी कच्छ आणि सौराष्ट्रकडे वळवण्याचा हा प्रस्ताव म्हणजे राज्यात पाण्याची कमतरता असतानाही लोकांच्या हक्काचं पाणी पळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नितीन भोसले यांनी केला आहे.

दरम्यान, 'महाराष्ट्राचं पाणी गुजरातला देण्याच्या करार 2010 ला अशोक चव्हाण यांनी केला. मी तो करार रद्द केला आणि पाणी आणलं', असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पण एकंदरीत लोकसभेचं वादळ पाहता विरोधक आणि सत्ताधारी पाणी प्रश्नाला घेऊन आक्रमक झाले आहेत. पण यावर सामान्य नागरिकांच्या हक्काचं पाणी कोणालाही जाऊ नये अशी महाराष्ट्रातल्या जनतेची भूमिका आहे.

हेही वाचा : हवामान खात्यानं वर्तवला नवा अंदाज, असा असेल यंदाचा मान्सून

Loading...

पाणी प्रकल्प रखडल्याने मतदानावर 60 गावांचा बहिष्कार

अख्ख्या महाराष्ट्रात पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापुरची ओळख आहे. पण, याच जिल्ह्यातल्या 60 गावांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. सिंचन प्रकल्प रखडल्याने गावकऱ्यांना इतका टोकाचा निर्णय घ्यावा लागला.

कोल्हापुरातल्या गगनबावडा, पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यात निवडणुकीच्या तोंडावर सध्या बहिष्काराचे फ्लेक्स झळकत आहेत. कारण या 3 तालुक्यांमधली 60 गावं पाणी नसल्याने मेटाकुटीला आली आहेत या गावांना पाणीपुरवढा करण्याची क्षमता असलेला हा धामणी मध्यम प्रकल्प गेल्या 18 वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे 60 गावांना पाणी नाही, त्यांची शेती सुकून जात आहे. गुरा-ढोरांनाही प्यायला पाणी कुठून आणायचं हा प्रश्न गावकऱ्यांनी विचारला आहे.

सिंचन प्रकल्प रखडला

1996 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. 2000 साली कामाला सुरूवातही झाली पण नंतर काम जे रखडलं ते आजपर्यंत सुरूच झाले नाही. आता जोपर्यंत धामणी मध्यम प्रकल्पाचं काम प्रत्यक्षात सुरू होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय 60 गावतल्या ग्रामस्थांनी घेतला.

इतक्या वर्षात निवेदनं देऊन झाली, आंदोलनं करून झाली, नेत्यांचे उंबरठेही झिजवून झाले पण काहीही फायदा झाला नाही. त्यामुळे या गावातल्या ग्रामस्थांनी प्रचारासाठी उमेदवारांना गावात प्रवेशबंदीही केली आहे.

निवडणुका आल्या की मतांचा जोगवा मागण्यासाठी दारोदार फिरणारे नेते, गगनबावडा, पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यातल्या या 35 हजारांहून अधिक मतदारांसाठी धामणी मध्यम प्रकल्पाचं काम सुरू करून ते पूर्ण करणार का असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

VIDEO: प्रवाशांनो सावधान! 'जेट' आलं जमिनीवर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2019 04:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...