मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पुणेकरांची मोठी चिंता मिटली, आता वर्षभर नाही करावी लागणार काळजी

पुणेकरांची मोठी चिंता मिटली, आता वर्षभर नाही करावी लागणार काळजी

पावासाने मोठी उसंत घेतली आणि त्यामुळे सर्वात कमी क्षमतेचं धरण भरण्यासाठी आजपर्यंतचा वेळ लागला.

पावासाने मोठी उसंत घेतली आणि त्यामुळे सर्वात कमी क्षमतेचं धरण भरण्यासाठी आजपर्यंतचा वेळ लागला.

पावासाने मोठी उसंत घेतली आणि त्यामुळे सर्वात कमी क्षमतेचं धरण भरण्यासाठी आजपर्यंतचा वेळ लागला.

पुणे, 12 ऑगस्ट : पुण्यासह जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत आज 62 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी चारही धरण 100 टक्के भरलं होतं. यंदा मात्र, पावसाने दरवर्षीप्रमाणे जोर पकडलेला नाही आणि घाटमाथ्यावर पावसाच प्रमाण कमी झाल्याने धरण अजून ही भरलेली नव्हती. खडकवासला धरण हे आठ दिवसापूर्वी पूर्ण भरेल अशी शक्यता होती. मात्र, पावासाने मोठी उसंत घेतली आणि त्यामुळे सर्वात कमी क्षमतेचं धरण भरण्यासाठी आजपर्यंतचा वेळ लागला. खडकवासला धरणसाखळीतला पाणीसाठा खडकवासला 99.16% पानशेत 70.75% वरसगाव 58.28% टेमघर 44.95% एकूण पाणीसाठा 18.63 टीएमसी चारही धरणांची मिळून टक्केवारी 63.91 % मुंबईकर क्रिकेटपटूनं पाहिलं IPL खेळण्याचं स्वप्न, संधी न मिळाल्यानं जीवाची बाजी दरम्यान, आज खडकवासला धरणातून अखेर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 10 वाजता धरणाचे दरवाजे उघडले असून 500 क्युसेकचा विसर्ग सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. खरंतर रात्री झालेला पाऊस खडकवासला धरण आणि इतर धरण क्षेत्रात समाधानकारक होता. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली असं म्हणायला हरकत नाही. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 23 लाख पार, 24 तासांत विक्रमी रुग्णांची नोंद गेल्यावर्षी 11 ऑगस्टअखेर खडकवासला प्रकल्पात 29.15 टीएमसी (100 टक्के) पाणीसाठा होता. यावर्षी ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस होत असून, धरणांतील पाणीसाठा जवळपास 63 टक्क्यांपर्यंत पोचला आहे. पुणे शहरातील वाढती लोकसंख्या पाहता दर महिन्याला साधारण दीड टीएमसी पाणी लागतं. त्यामुळे आता वाढलेल्या पाण्यामुळे वर्षभर पुणेकरांचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे.
First published:

Tags: Pune, Pune news

पुढील बातम्या