राज्यात घरगुती पाणीपट्टीत 17 टक्के तर औद्योगिक पाणीपट्टीत 50 टक्के वाढ

राज्यात पाणीपट्टीचे दर वाढवण्याचा निर्णय जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने निर्णय घेतलाय. शेतीसाठी आणि घरगुती वापरासाठी पाण्याचा दरात १७ टक्के तर औद्योगिक वापरासाठीच्या पाणी दरात 50 टक्के वाढ करण्यात आलीय. 2010 नंतर राज्यात प्रथमच पाणीपट्टी दरात एवढ्यामोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलीय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Jan 19, 2018 07:45 PM IST

राज्यात घरगुती पाणीपट्टीत 17 टक्के तर औद्योगिक पाणीपट्टीत 50 टक्के वाढ

19 जानेवारी, मुंबई : राज्यात पाणीपट्टीचे दर वाढवण्याचा निर्णय जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने निर्णय घेतलाय. शेतीसाठी आणि घरगुती वापरासाठी पाण्याचा दरात १७ टक्के तर औद्योगिक वापरासाठीच्या पाणी दरात 50 टक्के वाढ करण्यात आलीय. 2010 नंतर राज्यात प्रथमच पाणीपट्टी दरात एवढ्यामोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलीय.

मीटर न बसवता पाणी घेणाऱ्या नगरपालिका, महापालिका आणि उद्योगांना आता दीडपट पाणीपट्टी भरावी लागणार आहे. तर जलसंपदा विभागाशी करार न करता पाणी उचलणाऱ्यांना दोन पट दर द्यावा लागेल. पालिकांनी पिण्यासाठी पाणी घेऊन ते उद्योगांना पुरवल्यास तीन पट दर आकारला जाणार आहे. प्रवाही कालव्यावरील शेतकरी आणि उपसा योजनेवरील शेतकरी यांच्यातील पाणीपट्टी दरातील तफावत दूर करण्याचा निर्णयही सरकारने घेतलाय. त्यामुळे शासकीय उपसा सिचंन योजनेवरील शेतकऱ्यांना पाणीपट्टी आणि १९ टक्के वीज बिलाचा भार सोसावा लागणार आहे.

यापुढे प्रत्येकाला घनमापन पद्धतीनेच पाणीपट्टी भरावी लागणार आहे, जास्त पाणी वापरणाऱ्यांना जास्त पाणीपट्टी आणि कमी पाणी वापरणाऱ्यांना कमी पाणीपट्टी या सूत्रानुसार यापुढे पाणीपट्टी वसूली होणार आहे. मिनरल वॉटर, शीतपेये, बिअर उत्पादक उद्योगांसाठी पाण्याच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आलाय. हा पाणीपट्टी प्रति एक हजार लीटरला १६ रुपये एवढा होता. तो आता १२० रुपये असा दर करण्यात आलाय.

पाणी वापराचे नियोजन खालीलप्रमाणे

क वर्ग नगरपालिका ७० लिटर प्रति व्यक्ती

Loading...

ब वर्ग नगरपालिका १०० लिटर प्रति व्यक्ती

अ वर्ग नगरपालिकांसाठी १२५ लिटर प्रति व्यक्ती

मुंबई महापालिका सोडून इतर महापालिका आहेत, ज्यांची लोकसंख्या पन्नास लाखापेक्षा कमी आहे त्यांना १३५ लिटर प्रति व्यक्ती पाणीपट्टी भरावी लागेल तर मुंबईत १५० लिटर प्रति व्यक्ती पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2018 07:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...