हवेत उडाली फॉर्च्यूनर कार आणि दोन गाड्यांवर जाऊन आदळली, थरारक LIVE VIDEO

हवेत उडाली फॉर्च्यूनर कार आणि दोन गाड्यांवर जाऊन आदळली, थरारक LIVE VIDEO

नेमका हा अपघात झालाच कसा, असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

  • Share this:

चंदीगड, 14 जानेवारी : आतापर्यंत तुम्ही अंगावर शहारे आणणाऱ्या अपघातांचे अनेक सीसीटीव्ही व्हिडिओ पाहिले असतील. पण, चंदीगडमध्ये एका कारच्या अपघाताने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नेमका हा अपघात झालाच कसा, असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

टोयोटा कंपनीची भल्लीमोठी फॉर्च्यूनर एसयुव्ही हवेत उडाली आणि समोर उभा असलेल्या दोन गाड्यांवर जाऊन आदळली. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. ही घटना चंदीगड येथील सेक्टर-37 मध्ये घडली. या अपघातात ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाली. या व्यतिरिक्त इतर कुणालाही कोणतीही इजा झाली नाही.

सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की, ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा रस्त्यावर जास्त गर्दी नव्हती. तेव्हा एक फॉर्च्यूनर कार समोरून येत होती. टी पाँइट होता तरीही कार वळली नाही आणि थेट हवेत उडाली आणि भिंत ओलांडून दोन गाड्यांवर जाऊन आदळली. अचानक झालेल्या या अपघातामुळे एकच गोंधळ उडाली. लोकांनी धाव घेऊन गाड्यांवर आदळलेल्या फॉर्च्यूनर कारला सरळ केलं. त्यानंतर ड्रायव्हरला  खाली उतरवलं.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय रजिंदर सिंह असं या ड्रायव्हरचं नाव आहे.  रजिंदर सिंह यांचं मानसिक संतुलन ठीक नव्हतं.  अपघाताच्या वेळी त्याचं कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. यात त्याला गंभीर दुखापत झाली. त्याची वैद्यकीय चाचणी केली असता त्याच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाणही आढळून आले नाही. त्याच्यावर उपचार सुरू आहे. या अपघातात ज्या दोन गाड्यांचं नुकसान झालं आहे, त्या कारमालकांनी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Published by: sachin Salve
First published: January 14, 2020, 6:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading