मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कोरोना से डरोना! डोंबिवलीत दारू दुकानावर झुंबड, पाहा हा VIDEO

कोरोना से डरोना! डोंबिवलीत दारू दुकानावर झुंबड, पाहा हा VIDEO


31 तारखेपर्यंत दुकानं बंद होणार असल्यामुळे तळीरामांनी आपला मोर्चा पहिले दारूच्या दुकानाकडे वळवला आहे.

31 तारखेपर्यंत दुकानं बंद होणार असल्यामुळे तळीरामांनी आपला मोर्चा पहिले दारूच्या दुकानाकडे वळवला आहे.

31 तारखेपर्यंत दुकानं बंद होणार असल्यामुळे तळीरामांनी आपला मोर्चा पहिले दारूच्या दुकानाकडे वळवला आहे.

  • Published by:  sachin Salve

डोंबिवली, 19 मार्च : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवलीतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  त्यामुळे डोंबिवलीकरांची दारूच्या दुकानावर एकच गर्दी पाहण्यास मिळत आहे.

कोरोना व्हायरसमुळे राज्यात रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.  खबरदारी म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमू नये, यासाठी ठिकठिकाणी बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कल्याण डोंबिवलीमध्येही 31 मार्चपर्यंत जीवनावश्यक वगळून दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

31 तारखेपर्यंत दुकानं बंद होणार असल्यामुळे तळीरामांनी आपला मोर्चा पहिले दारूच्या दुकानाकडे वळवला आहे.  डोंबिवलीमधील वाईन शॉपवर दारू विकत घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. प्रशासन गर्दी करू नका, असं सांगत असलं तरी दारू विकणारे दुकानदार आणि विकत घेणारे नागरिक याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

कल्याण डोंबिवलीतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने 31 मार्च 2020 पर्यंत बंद

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवलीतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला असून त्याचे पालन न करणाऱ्या व्यवसायिकांवर कलम 188 नूसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

कोरोनाचा फैलाव अधिक वाढण्याची शक्यता गृहीत धरून हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, शुक्रवारी सकाळपासून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या हद्दीतील जीवनावश्यक वस्तू, बेकरी, डेअरी, किराणा दुकाने, मेडीकल स्टोअर्स, रुग्णालय/क्लिनिक, भाजीपाला आदी दुकाने आणि आस्थापना वगळता इतर सर्व दुकाने , व्यावसायिक आस्थापना 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कल्याण डोंबिवलीमहापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबत आदेश दिले असून त्याचे उल्लंघन केल्यास कलम 188 प्रमाणे कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

First published: