• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • Youtube वर VIDEO बघून अजगर समजून सर्वात विषारी सापाला गेले पकडायला, नंतर काय झालं पाहा

Youtube वर VIDEO बघून अजगर समजून सर्वात विषारी सापाला गेले पकडायला, नंतर काय झालं पाहा

गावकऱ्यांनी आधी यूट्यूबवर व्हिडीओ पाहिला आणि त्यानंतर...VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं

 • Share this:
  नालागड, 9 ऑक्टोबर : हिमाचल प्रदेशातील (Himachal pradesh) सर्वात मोठं औद्योगिक क्षेत्र नालागडमधून एक वृत्त समोर आलं आहे. जंगलातून अनेक जनावर निवासी भागांमध्ये येत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. नालागढमधील माजरा गावात सकाळी सकाळी शनिवार एक 10 ते 12 फुटांचा अजगर अचानक गावातील एका घरात शिरला. यानंतर लोकांमध्ये दहशत पसरली. सुदैवाने या जनावरामुळे कोणालाही काही दुखापत झाली नाही. वेळेत गावातील तरुणांनी या अजगराला पकडलं आणि त्याला जंगलात सोडून आले. यासाठी तरुणाने युट्यूबवर (YouTube) अजगर पकडण्याची एक पद्धत पाहिली आणि त्यानुसार तरुणाने साहस दाखवित एक काठी, पिशवी आणि पायपाच्या मदतीने अजगरला पकडलं. हे ही वाचा-देशातील प्रसिद्ध मंदिरातील महिलेचा Dance Video पाहून पुजारी संतापले सुरुवातील तरुणाने अजगराला एका भिंतींच्या दिशेपर्यंत नेलं आणि त्यानंतर पाईपच्या मदतीने अजगरला पिशवीत टाकलं. अजगरला पकडल्यानंतर पकडल्यानंतर गावकऱ्यांनी दूर जंगलात त्याला सोडून आलं. दरम्यान या घटनेचा व्हिडीओही त्यांनी शूट केला. (Watch the VIDEO on Youtube to catch the most venomous snake then see what happened) हा व्हिडीओ समोर आल्यानंतर यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहे. काहींनी दिलेल्या माहितीनुसार हा अजगर नसून russel viper नावाचा अत्यंत विषारी साप आहे. मात्र गावकर सापांच्या जातीबद्दल अनभिज्ञ होते. त्यांना नेमका साप ओळखता आला नाही. आणि त्यांनी अजगर समजून russel viper नावाचा अत्यंत विषारी साप पकडला.  
  Published by:Meenal Gangurde
  First published: