Home /News /news /

तरुणाने मोबाईलची बॅटरी चावण्याचा केला प्रयत्न, झाला स्फोट पाहा हा VIDEO

तरुणाने मोबाईलची बॅटरी चावण्याचा केला प्रयत्न, झाला स्फोट पाहा हा VIDEO

मोबाईल दुरूस्ती करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांपैकी एक जण मोबाईलच्या बॅटरीशी काही तरी करत होता.

पिंपरी चिंचवड, 09 मार्च : मोबाईल फोन वापरण्याचं हे काही जणांना जणू व्यसनचं जडलं आहे. वारंवार 'मोबाईल फोन वापरणे कमी करावे' असं सांगितलं जात असलं तरी काही महाभाग यातून काहीही शिकत नाही. पिंपरी चिंचवडमध्ये मोबाईल फोनच्या बॅटरीसोबत नको ते धाडस करण्याचं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. पिंपरी शहरातील  साई चौकात  मोबाईल दुरुस्तीच मोठी बाजारपेठ आहे. याच परिसरात असलेल्या रुपम मोबाईल शॉपीमध्ये दोन ग्राहक आपला मोबाईल दुरुस्तीसाठी घेऊन आले होते. दुकानातील व्यक्ती ही मोबाईल रिपेअर करण्यात व्यस्त होती. तेव्हा दोन्ही ग्राहकांपैकी एकाच्या हातात मोबाईलच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला. स्फोट झाल्यामुळे तिघांनीही दुकानातून बाहेर धूम ठोकली. हा सगळा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जेव्हा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा व्हिडिओ तपासला असता, सगळेच जण हैराण झाले. मोबाईल दुरूस्ती करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांपैकी एक जण मोबाईलच्या बॅटरीशी काही तरी करत होता. काही वेळानंतर या तरुणाने बॅटरी थेट तोंडात पकडली. या तरुणाने बॅटरी चावण्याचा प्रयत्न केला असता, तेव्हा या बॅटरीचा स्फोट झाला. या घटनेत संबधित तरुणाच्या तोंडाला चांगलंच भाजलं आहे. त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं  असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळेल.  या घटनेमुळे काही काळ परिसरात घबराटही पसरली होती. दुसऱ्या तरुणीला I Love You म्हणाला म्हणून बायकोने जबरदस्त धुलाई केली दरम्यान, सोशल मीडियावर नवरा बायकोचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या पतीला बेदम मारहाण करताना दिसत आहे. तसंच या मारहाणीदरम्यान ती महिला आपल्या पतीवर संतापही व्यक्त करताना दिसत आहे. दुसऱ्या तरुणीला I Love You म्हटल्याने बायकोने नवऱ्याला बेदम मारहाण केली, अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये महिला अत्यंत निष्ठूरपणे आपल्या पतीला मारत आहे. मार खाणारा तो पती तिच्याकडे क्षमा-याचना करत आहे. मात्र संतापलेली महिला थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. महिला आपल्या पतीला मारहाण करत असताना घरात असणारे इतर लोक तिला पाठिंबा दर्शवत अधिक मारहाण करण्यास फूस लावत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये होणारे संवाद मराठीमध्ये असल्याने हा प्रकार महाराष्ट्रातच घडल्याची शक्यता आहे. मात्र, हा व्हायरल व्हिडिओ नेमका कुठल्या भागातील आहे आणि या व्हिडिओबाबत केला जाणारा दावा कितपत खरा आहे, याबाबतची ठोस माहिती मिळू शकलेली नाही. 'न्यूज18 लोकमत' या व्हिडिओची आणि त्याबाबत करण्यात येत असणाऱ्या दाव्याची पुष्टी करत नाही.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Battery blast, Mobile, Pimpari chinchawad, Pune, Pune breaking, Pune news

पुढील बातम्या