Home /News /news /

VIDEO: पु्ण्याहून कोल्हापूरकडे निघालेलं हेलिकॉप्टर अचानक उतरलं छोट्या शाळेच्या मैदानात; Emergency Landing ची धांदल पाहा

VIDEO: पु्ण्याहून कोल्हापूरकडे निघालेलं हेलिकॉप्टर अचानक उतरलं छोट्या शाळेच्या मैदानात; Emergency Landing ची धांदल पाहा

Kolhapur News: आकाशात घिरट्या घालत येणाऱ्या एका अज्ञात हेलिकॉप्टरने (Helicopter) कोल्हापूरातील (Kolhapur) कोपर्डे शाळेतील मैदानावर (School Ground) अचानक अपात्कालीन लॅंडींग (emergency landing) केलं आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता शाळेच्या मैदानात हेलिकॉप्टर उतरल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुढे वाचा ...
कोल्हापूर, 23 फेब्रुवारी: आकाशात घिरट्या घालत येणाऱ्या एका अज्ञात हेलिकॉप्टरने कोल्हापूरातील कोपर्डे शाळेतील मैदानावर अचानक अपात्कालीन लॅंडींग केलं आहे. या हेलिकॉप्टरने कोणतीही पूर्वसूचना न देता शाळेच्या मैदानात उतरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. यावेळी शाळेच्या मैदानात कोणीही नव्हतं. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. या घटनेनंतर आसपासच्या गावकऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर पुण्याहून गारगोटी याठिकाणी जात होतं. पण या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना अपात्कालीन लॅंडिंग करावं लागलं आहे. हे हेलिकॉप्टर पुण्यातील एका खाजगी कंपनीचं असून काही पाहुण्यांना घेण्यासाठी ते गारगोटीला जात होतं. पण गारगोटीला जात असताना मध्येच तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे कोल्हापूरातील कोपार्डे शाळेतील मैदानावर अपात्कालीन लॅंडिंग करावं लागलं. हे हेलिकॉप्टर शाळेच्या मैदानात उतऱ्यानंतर, शाळेच्या प्रांगणात हेलिकॉप्टर कोसळल्याची अफवा गावात पसरली. त्यामुळे अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. साधारणतः सकाळी साडे दहाच्या सुमारास हे हेलिकॉप्टर कुंभी कारखाना परिसरात आकाशात घिरट्या घालत होतं. अपात्कालीन लॅंडिंगसाठी त्यांना योग्य जागा सापडत नव्हती. त्यानंतर त्यांनी सकाळी 11 च्या सुमारास शाळेच्या पटांगणावर यशस्वीपणे लॅंडिंग करण्यात आलं. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. हे ही वाचा-चालायचा कंटाळा म्हणून शॉर्टकट घेतला आणि भररस्त्यात झाली फजिती; पाहा VIDEO यावेळी महाविद्यालयाच्या शिक्षकांनी पायलटशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून कोणतीही माहिती मिळाली नव्हती. यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर गर्दी पांगवण्यासाठी शिक्षकांनी जमलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर स्थानिक पोलिसही घटनास्थळी आले. यावेळी वैमानिक वेणू माधव यांनी हे हेलिकॉप्टर पुण्यातील एरो ट्रान्स या खाजगी कंपनीचं असल्याची माहिती दिली. हे हेलिकॉप्टर गारगोटी येथून काही पॅसेंजर घेऊन मुंबईला जाणार होतं, अशी माहितीही वैमानिकाने दिली.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Helicopter, Kolhapur, Viral video.

पुढील बातम्या