Home /News /news /

'किसान दिनी' भयंकर घटना! भीषण अपघातात शेतकरी पती-पत्नीचा मृत्यू, बैलानेही गमावला जीव

'किसान दिनी' भयंकर घटना! भीषण अपघातात शेतकरी पती-पत्नीचा मृत्यू, बैलानेही गमावला जीव

ट्रकने बैलगाडीला धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात बैलगाडीमधील महिला जागीच ठार झाली, तर एका व्यक्तीचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.

वाशिम, 23 डिसेंबर : वाशिम-पुसद महामार्गावर रेल्वे उड्डाण पुलानजीक भरधाव ट्रकने बैलगाडीला धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात बैलगाडीमधील महिला जागीच ठार झाली, तर एका व्यक्तीचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. बैलगाडीचा एक बैलही जागीच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. वाशिम शहरातील लक्ष्मण नकले आणि राजूबाई नकले हे दोघे वृद्ध पती-पत्नी आपल्या सुपखेला शिवारातील शेतीमधून घरी परत येत असताना वाशिमवरून पुसदच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने बैल गाडीला जबर धडक दिली. या अपघातात बैलगाडीमधील राजूबाई नकले ( वय 55 ) ही वृद्ध महिला जागीच ठार झाली तर लक्ष्मण नकले ( वय 60 ) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारसाठी दवाखान्यात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. शेतीमधून घरी परत येताना वृद्ध शेतकरी असलेल्या पती-पत्नीच्या अपघाती मृत्यूमुळे शहरातील शुक्रवार पेठ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर ट्रक चालकाला वाशिम पोलिसांनी अटक केली असून ठाणेदार ध्रुवास बवनकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मात्रे हे पुढील तपास करत आहेत. दरम्यान, 'किसान दिनी' शेतकऱ्यांच्या संघर्षाबद्दल चर्चा होत असताना वाटेतच शेतकरी दाम्पत्याने जीव गमावल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Farmer, Washim, WASHIM NEWS

पुढील बातम्या