Home /News /news /

24 वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा, पोलिसांनी केली 4 आरोपींना अटक

24 वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा, पोलिसांनी केली 4 आरोपींना अटक

या हत्येप्रकरणी वाशिम पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत 4 आरोपींना अटक केली.

वाशिम, 22 डिसेंबर : वाशिम शहरात सोमवार 21 डिसेंबर रोजी भर दुपारी अब्दुल वसीम अब्दुल अजीम या 24 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी वाशिम पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत 4 आरोपींना अटक केली असून केवळ आपसातील जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अटक केलेल्या आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करुन त्यांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. या हत्येमुळं शहरात खळबळ उडाली होती. शहरातील छत्रपती शिवाजी चौक परिसरातील भवानीनगर बेंदाडी येथे राहत असलेला अब्दुल वसीम अब्दुल अजीज या इसमाचा मृतदेह नगीना मशिदीच्या समोरील भागात टॉवरखाली आढळून आला होता. याप्रकरणी मृतकाचा लहान भाऊ अब्दुल मोसीन अब्दुल अजीम यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या हत्येचा तपास पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक धृवास बावनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमाकांत खंदारे, सपोनि दानडे,पोहेकॉ. श्रीवास्तव,घुगे,भवाळ, पोलीस नाईक नागरे, पोना अरखराव, पोकॉ ज्ञानेश्वरमात्रे,विठ्ठल महाले, वाकुडकर,बांगर हे करत असून तपासाअंती आकाश गणेश गवळी,रामेश्वर बाबुलाल जिजोते, राजा उर्फ चांद शहा सादिक शहा आणि अमोल शंकरअप्पा निंबाळकर अशा चार आरोपींना अटक करण्यात आली. या चारही आरोपींना 24 डिसेंबर पर्यत पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे मृतक अब्दुल वसीम आणि आकाश गवळी याच्याविरुद्धही गुन्हे दाखल आहेत. मृतक अब्दुल वसीम आणि आरोपी आकाश गवळी एकाच परिसरात राहत असून इतर तीन आरोपी आकाश गवळी याचे मित्र आहेत.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Washim, WASHIM NEWS

पुढील बातम्या