वाशिमचा रँचो, नदी पार करण्यासाठी केला भन्नाट देशी जुगाड!

वाशिमचा रँचो, नदी पार करण्यासाठी केला भन्नाट देशी जुगाड!

बाळखेड येथील सुशांत भारती या युवकाचं जेमतेम 10 वी पर्यंतच शिक्षण झालं.

  • Share this:

किशोर गोमाशे, प्रतिनिधी

वाशिम, 31 डिसेंबर :  ग्रामीण भागातही अनेक प्रतिभावंत व्यक्ती आहेत. अशाच एका ग्रामीण रँचोने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अल्प खर्चात भंगारातील वस्तू वापरून  पर्यावरण पूरक सायकल बोट तयार करून आपल्या शेतात जाण्याची समस्या निकाली काढली आहे.

बाळखेड येथील सुशांत भारती या युवकाचं जेमतेम 10 वी पर्यंतच शिक्षण झालं. त्यानंतर तो आपल्या वडिलांच्या पारंपरिक शेतीकडे वळला. त्याची शेती पैनगंगा नदी काठी असून त्या शेतात जाण्यासाठी नदी ओलांडून जावे लागते.

पैनगंगा नदीमध्ये किमान वर्षातील 9 महिने पाणी राहत असल्याने शेतात जाण्यासाठी रस्त्याशिवाय  पर्याय नव्हता.

शेतात जाण्यासाठी रस्त्याचा वापर केल्याने वेळ आणि पैशाचा अपव्यय होत असे तसंच शेतीतील कामे ही वेळेवर होत नसल्याने सुशांत ने शक्कल लढवत त्यावर मात करण्याचं ठरवलं.

सुशांत यांच्या शेतात जाण्यासाठीच्या सर्वात जवळच्या मार्गात अडथळा होता ती म्हणजे पैनगंगा नदी. या नदीला ओलांडून गेल्यावर त्याच्या शेतात अगदी काही मिनिटात पोहचता येते. त्यामुळे सुशांत याने नदी पार करण्यासाठी बोटी चा बाजारात शोध घेणे सुरू केले.

बाजारात फायबरची बोट बरीच महागडी मिळते. ती परवडणारी नसल्याने सुशांत ने भंगारातील वस्तू जमा करून अवघ्या 1750 रुपयात एक सायकल बोट (देशी जुगाड) तयार केली.

सुशांत भारती हा शेतातही कायम नवनवीन प्रयोग करत असतो त्यानं तयार कलेली ही सायकल बोट खूप उपयुक्त असून या बोटीमुळे शेतात जाणे सोयीचे झाले आहे.

सुशांत भारती या युवकाने तयार केलेल्या सायकल बोटीमुळे शेतात जाणे सुकर झाले असून अशा ग्रामीण रँचोंना आर्थिक पाठबळ मिळाल्यास नव नवे शोध लावण्यात मोठा हातभार लागेल.

First published: December 31, 2019, 8:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading