शेतकऱ्यांच्या खतावर गोदाम मालकांनी मारला डल्ला, 420 चा गुन्हा दाखल

शेतकऱ्यांच्या खतावर गोदाम मालकांनी मारला डल्ला, 420 चा गुन्हा दाखल

गोदाम मालकांनी सदरचा खताचा साठा परस्पर चोरून विक्री केल्याची घटनासमोर आल्यानं गोदाम मालकांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला

  • Share this:

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी, 20 डिसेंबर : शेतकऱ्यांसाठी पुरवण्यात येणाऱ्या अनुदानित निमकोटेट खताचा साठा परस्पर विकणाचा प्रकार समोर आला आहे. गोदाम मालकाने तब्बल ५० किलो वजन असलेल्या सुमारे १ लाख ९० हजार ९१ रुपयांचा साठा चोरून विक्रीसाठी लपवून ठेवला होता.

गोदाम मालकांनी सदरचा खताचा साठा परस्पर चोरून विक्री केल्याची घटनासमोर आल्यानं गोदाम मालकांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोदाम मालक बापूराव नारायण भोसले आणि अमित झंवर असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत.

या दोघांनी स्वतःच्या फायद्यासाठी संगनमताने शेतकऱ्यांना पुरवण्यात येणारा निम कोटेट युरिया खताच्या प्रत्येकी ५० किलो वजन असलेल्या सुमारे १ लाख ९० हजार ९१ रुपये किंमतीच्या १२१ गोणींचा साठा वळ येथील वेअर हाऊस आर / एफ - १८ या गोदामात करून ठेवला होता.

याबाबतची माहिती कृषी विभागाला मिळाल्याने कृषी अधिकाऱ्यांनी २५ नोव्हेंबर रोजी छापा टाकून येथील खताचा साठा जप्त करून खताचा नमूना तपासणीसाठी विशेष रसायन शास्त्रज्ञ, खत नियंत्रण प्रयोग शाळा नाशिक येथे पाठवण्यात आला होता. त्यामध्ये प्राप्त झालेल्या अहवालात सदरचे जप्त केलेले खत हे शेतकऱ्यांना पुरवण्यात येणारे निम कोटेट युरिया खत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यामुळे कृषी निरीक्षक नितेंद्र पानपाटील हे गुण नियंत्रण अधिकारी राजेंद्र कांबळे यांच्यासह गुरुवारी वळ येथील खताचा जप्त केलेल्या साठा पाहणीसाठी गोदामात आले असता त्यांना गोदामातून खताच्या गोणी गायब असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे त्यांनी त्याबाबतची चौकशी केली असता खताच्या गोणी चोरून नेल्याचं समजलं.

त्यामुळे गोदाम मालक बापुराव भोसले आणि अमित झंवर या दोघांच्या विरोधात खत नियंत्रण आदेश आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम व भादंवि.३७९ ,४२० ,३४ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास एपीआय.के.आर.पाटील करीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bhiwandi
First Published: Dec 20, 2019 09:01 PM IST

ताज्या बातम्या