दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात चक्क एसटीच्या बोनेटमधून होते दारुची वाहतूक!

दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात चक्क एसटीच्या बोनेटमधून होते दारुची वाहतूक!

हिंगणघाट डेपोचे एसटी चालक देवीदास लिंबाडे हे एसटीच्या बोनेट मधून एका पिशवीत दारु घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

  • Share this:

नरेंद्वर मते, वर्धा, 20 सप्टेंबर : दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात एसटीच्या बोनेटमधून दारुची वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे बसचा चालकच दारुची वाहतूक करताना सापडल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय.

हिंगणघाट डेपोचे एसटी चालक देवीदास लिंबाडे हे एसटीच्या बोनेट मधून एका पिशवीत दारु घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर ही एसटी बस स्थानकात येताच पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. यात 12 हजारांची दारु जप्त करण्यात आली असून बस चालकाला अटक करण्यात आलीये.

हिंगणघाट डेपोच्या एसटीचे चालक देवीदास लिंबाडे यांनी अकोला येथून येताना चक्क एसटीच्या बोनेटमधून एका पिशवीत डिप्लोम्याट कंपनीच्या 180 एमएलच्या 40 निपा आणल्यात. हा चालक नेहमीच दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आज सापळा रचून पोलिसांनी एसटी बस स्थानकात येताच ही कारवाई केली.

यात एकूण बारा हजाराचा माल जप्त करण्यात आला असून, बसचालकालाही अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात दारूची वाहतूक करण्यासाठी वापरलेली नवीन शक्कल पोलिसांना विचार करायला लावणारी आहे.

 अंगावर काटा आणणारा VIDEO, तरुणाने एसटी खाली घेतली उडी

First published: September 20, 2018, 5:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading