मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पंढरपुरात वारकऱ्यांच्या राहुटीवर भिंत कोसळली, एकाचा मृत्यू

पंढरपुरात वारकऱ्यांच्या राहुटीवर भिंत कोसळली, एकाचा मृत्यू

वारकऱ्यांच्या राहुटीवर बाजूची संरक्षक भिंत कोसळल्याने एक भाविक जागीच मृत्यू झाला तर 2 महिला भाविक जखमी झाल्या आहेत.

02 जुलै : पंढरपूर येथील गेंड वस्ती परिसरात उतरलेल्या वारकऱ्यांच्या राहुटीवर बाजूची संरक्षक भिंत कोसळल्याने एक भाविक जागीच मृत्यू झाला तर 2 महिला भाविक जखमी झाल्या आहेत. राज्यभरातून आलेल्या दिंड्या पंढरपुरच्या वेशीवर दाखल झाल्या आहे. लाखो वारकऱ्यांनी पंढरपूर नगरी वारकऱ्यांनी फुलून गेलीये. गेंड वस्ती परिसरातही भाविकांनी गर्दी केलीये. आज दुपारी वारकऱ्यांच्या एका राहुटीवर बाजूची संरक्षण भिंत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात एका वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. रामकिशन माधवराव कराळे (वय 70 वर्षे) रा.पिंगळी (कोथळी) ता.,जि. परभणी असं मयत वारकऱ्याचे नाव आहे या दुर्घटनेत सुमनबाई तुकाराम कुदळे (वय 65 वर्षे) आणि मंजुळाबाई दत्तात्रय कुदळे (वय 60 वर्षे) अशी जखमी झाल्या वारकऱ्यांची नावं आहेत. दोघीही जिंतूर, जि. परभणी येथील आहेत. जखमी महिला भाविकांवर पंढरपूरातील कॉटेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत रामकिशन कराळे यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह त्यांच्या गावी पाठवून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
First published:

Tags: Pandharpur, पंढरपूर

पुढील बातम्या