इन्स्टंट एनर्जी हवी मग चहा-कॉफी सोडा, फक्त जिने चढा-उतरा

इन्स्टंट एनर्जी हवी मग चहा-कॉफी सोडा, फक्त जिने चढा-उतरा

एक कप कॉफीपेक्षा जास्त जिने चढल्याने शरीराला ऊर्जा मिळते, असं संशोधनात दिसून आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 04 मार्च : सकाळी उठल्यानंतर, ऑफिसमध्ये काम करताना थकल्यानंतर मेंदू आणि शरीर पुन्हा चार्ज करण्यासाठी आपण कॉफी (Coffee) पितो. मात्र खरं तर कॉफीपेक्षा तुम्ही तुमच्या घराबाहेरील किंवा ऑफिसच्या बिल्डिंगमधील जिने चढलात आणि उतरलात तर तुम्हाला जास्त ऊर्जा मिळेल. एका संशोधनात ही बाब समोर आली आहे.

लिफ्ट असताना जिने चढणं-उतरणं म्हणजे तुमच्या जीवावर येत असेल. जिने चढल्याने थकायला होतं, असं तुम्हाला वाटतं. मात्र जिने चढल्याने आणि उतरल्याने थकवा दूर होतो. अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियाच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.

हे वाचा - दररोज दूध पिताय सावधान ! हाडं मजबूत ठेवणाऱ्या दुधामुळे होतोय जीवघेणा आजार

ज्या व्यक्तींची झोप पूर्ण होत नाही, अशा व्यक्तींचा या अभ्यासात समावेश होता. फक्त 10 मिनिटं या व्यक्ती जिने चढले, उतरले आणि थोडं चालले, यामुळे त्यांना जास्त ऊर्जा मिळाली. विशेष म्हणजे कॅफिनेचं सेवन करणाऱ्यांच्या तुलनेत या व्यक्तींमध्ये जास्त ऊर्जा होती.

कॅफिनेमुळे मिळणाऱ्या ऊर्जेचा परिणाम काही वेळापुरताच मर्यादित असतो. उलट कॅफिनेच्या सेवनामुळे आरोग्याला हानीच पोहोचते. त्यामुळे संशोधकांनी तुम्हाला लगेच ऊर्जा मिळेल, असा मार्ग शोधला आहे. तुम्हाला ऊर्जा कमी झाल्यासारखी वाटली तर तुम्ही कॉफी पिण्याऐवजी जिने चढा आणि उतरा. फक्त १० मिनिटं जरी तुम्ही असं केलं तर तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल आणि तुम्ही कामासाठी पुन्हा तयार व्हाल.

 हे वाचा - ब्रेडवर लावताय ते Butter अळ्यांपासून बनवलेलं तर नाही ना? Video पाहून येईल किळस

First published: March 4, 2020, 6:29 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading