09 जून : सातारा जिल्ह्यातील वाई नगरपालिकेच्या नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे आणि त्यांचे पती सुधीर शिंदे यांना ठेकेदाराकडून लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ठेकेदाराची साधी बिलं काढण्यासाठी या नगराध्यक्ष महाशयांनी 14 हजारांची लाच मागितली होती.
या संदर्भात ठेकेदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदवल्यानंतर, अधिकाऱ्यांनी सापळा रचून शिंदे दाम्पत्याला ताब्यात घेतलं आहे. या अटकेमुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्रतिभा शिंदे या भाजपच्या नेत्या असून त्यांचे पती द्रविड हायस्कूलमध्ये पर्यवेक्षक आहेत. पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना भाजपच्या प्रतिभा शिंदे अवघ्या एका मताने भाजपाच्या नगराध्यक्षपदी निवडून आल्या होत्या.
Load More