बंगळुरू,ता.12 मे: कर्नाटक विधानसभेसाठी शांततेत मतदान सुरू असून 4 वाजेपर्यंत 60 टक्के मतदान झालं. किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडलं. पाऊस आल्यानं हुबळीत काही केंद्रांवर मतदानात अडथळा निर्माण झाला.
सकाळी सात वाजता मतदान सुरू झालं. संध्याकाळी 6 पर्यंत मतदान चालणार असून 65 टक्क्यांपर्यंत मतदान होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. कर्नाटक विधानसभेच्या एकून 224 जागा असून 222 जागांवर मतदान होत आहे.
एका जागेवर भाजपचे उमेदवार बी एन विजयकुमार यांचं अकस्मिक निधन झाल्यानं आणि एका जागेवर बनावट ओळखपत्र आढळल्यानं मतदान लांबणीवर टाकण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly, BJP, BS Yeddyurappa, Chief minister siddaramaiah, Congress, Election, Karnatak, Narendra modi, Rahul gandhi, Voting, कर्नाटक, नरेंद्र मोदी, निवडणूक, मतदान, येडियुरप्पा, राहुल गांधी, विधानसभा, सिद्धरामय्या