कर्नाटकात 70 टक्क्यांच्यावर मतदान, आता प्रतिक्षा निकालांची!

2019 च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून ओळखल्या गेलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. राज्यातल्या मतदानाची टक्केवारी 70 टक्क्यांच्या वर जाण्याची शक्यता आहे.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: May 12, 2018 06:57 PM IST

कर्नाटकात 70 टक्क्यांच्यावर मतदान, आता प्रतिक्षा निकालांची!

संदिप राजगोळकर,बंगळुरू,ता.12 मे: 2019 च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून ओळखल्या गेलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. राज्यातल्या मतदानाची टक्केवारी 70 टक्क्यांच्या वर जाण्याची शक्यता आहे.

गेल्या महिनाभरापासून प्रचारांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. 15 मे ला निवडणूकीचा निकाल स्पष्ट होणार असून कोणत्या पक्षाचं सरकार स्थापन होणार याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागली आहे.

दक्षिणेतलं प्रमुख राज्य म्हणून कर्नाटकला ओळखलं जातं. 224 जागांसाठी विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात मोर्चेबांधणीही सुरू झाली. कर्नाटकचं वैशिष्ट्य म्हणजे 1985 नंतर इथं एकही सरकार दुसऱ्यांदा निवडून आलेलं नाही. त्यामुळे सिद्धरामय्या सरकारला खाली खेचण्यासाठी भाजपनं जोरदार प्रयत्न केले.

गेल्या पंधरा दिवसात तर कर्नाटक मधील राजकारण ढवळून निघालं होतं. सत्ताधारी कॉंग्रेसने इथल्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता दिल्यानं प्रचाराला वेगळाच रंग आला. बेल्लारी मधील वादग्रस्त रेड्डी बंधूंची उमेदवारी असो शेतकऱ्यांची कर्जमाफी असो नागरी समस्या असो या सगळ्यांचा ऊहापोह आणि चर्चा या प्रचारात झाली.

तर शेवटच्या टप्प्यात आर आर नगर मतदारसंघात बनावट मतदान कार्ड सापडल्याने निवडणूक आयोगानं या मतदार संघातलं मतदान लांबणीवर टाकलं. आता तिथं 28 मे रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक जरी काँग्रेस आणि भाजप विरोधात असली तरी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी या दोन नेत्यांमधील संघर्ष या निवडणुकीच्या निमित्ताने दक्षिणेत पाहायला मिळाला.

Loading...

आज मतदानाचा दिवस असल्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली होती पण आदल्या रात्री म्हणजेच शुक्रवारी रात्री कर्नाटक राज्यातल्या जवळपास दहा ते पंधरा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला त्यामुळे नैसर्गिकरित्या जरी राज्यात गारवा निर्माण झाला असला तरी राजकीय वातावरण मात्र आजहीही तापलेले आहे असच चित्र पहायला मिळाला. दरम्यान बेळगाव सह सीमाभागातही आजच मतदान शांततेत पार पडले.

किरकोळ वादावादी वगळता अनेक ठिकाणी हे मतदान शांततेत झाले. बेळगाव भागातही महाराष्ट्र एकीकरण समितीची प्रतिष्ठा पणाला लागली असून या भागात पुन्हा मराठी भाषिक समितीलाच निवडून देणार का याचीही चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. 30 वर्षांची परंपरा मोडून सिद्धरामय्या दुसऱ्यांदा सत्ता खेचून आणतात का? आणि कर्नाटकात विजय मिळवून भाजप दक्षिण दिग्विजयाचं व्दार उघडणार का हे मंगळवारच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2018 06:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...