फोक्सवॅगननं 13 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतली फेरीरी कंपनी

फोक्सवॅगन या बलाढ्य कार कंपनीनं इटलीची फेरारी कंपनी विकत घेतली आहे.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 2, 2017 02:55 PM IST

फोक्सवॅगननं 13 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतली फेरीरी कंपनी

02 एप्रिल : फोक्सवॅगन या बलाढ्य कार कंपनीनं इटलीची फेरारी कंपनी विकत घेतली आहे. एकूण 13 अब्ज डॉलर्स, म्हणजे जवळपास 90 हजार कोटी रुपयांचा हा करार आहे.

फेरारीचे 90 टक्के शेअर्स फोक्सवॅगननं विकत घेतले आहेत. त्यामुळे आधीच अनेक स्पोर्टस् कार ब्रँड असलेल्या फोक्सवॅगनकडे आणखी एका जगप्रसिद्ध ब्रँड आला आहे.

फेरारी हा ब्रँड इटलीच्या फियाट कंपनीकडे होता. या कंपनीला नफाही चांगला मिळत होता पण फियाटनं प्रवासी गाड्यांवर लक्ष केंद्रीत करायचं ठरवलं आहे. अशात फेरारीत करावी लागणारी मोठी गुंतवणूकही फियाटला नको होती. त्यामुळे गेले अनेक महिने फोक्सवॅगन आणि फियाटमध्ये बोलणी सुरू होती. या करारमुळे जगाच्या ऑटो व्यवसायात जर्मनीचं अधिराज्य का, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

फोक्सवॅगनकडे कोणकोणते ब्रँडस् आहेत?

- स्वतःचा फोक्सवॅगन ब्रँड

Loading...

- लक्झरी ब्रँडमध्ये भारतात तिसऱ्या क्रमांकावर असलेली ऑडी

- मधल्या सेगमेंटमध्ये चालणारी स्कोडा

- ३ ते ४ कोटींच्या पुढे जिची किंमत सुरू होते ती बेंटली

- जगातली सर्वात महागडी आणि प्रतिष्ठित गाडी बनवणारी रोल्स रॉईस

(अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा आणि शाहरुख खानकडे ही गाडी आहे)

- स्पोर्टस् ब्रँड बुगाटी

- स्पोर्टस् कार बनवणारी जगप्रसिद्ध लॅम्बॉर्गिनी

- महागड्या बाईक्समध्ये अग्रगण्य असलेली दुकाटी

- अवजड वाहनं बनवणारी स्कानिया

- फेरारी ब्रँडची भर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 2, 2017 02:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...