मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

ज्वालामुखीतून धूराचे लोट निघत असताना तिथेच सुरू होता विवाह सोहळा

ज्वालामुखीतून धूराचे लोट निघत असताना तिथेच सुरू होता विवाह सोहळा

कीकडे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने सगळी धावपळ सुरु होती तिथेच एक विचित्र चित्र बघायला मिळालं.

कीकडे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने सगळी धावपळ सुरु होती तिथेच एक विचित्र चित्र बघायला मिळालं.

कीकडे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने सगळी धावपळ सुरु होती तिथेच एक विचित्र चित्र बघायला मिळालं.

  • Published by:  Manoj Khandekar
फिलिपाइन्स,18 जानेवारी: फिलिपाइन्सची राजधानी मनीलापासून जवळच ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. इकीकडे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने सगळी धावपळ सुरु होती तिथेच एक विचित्र चित्र बघायला मिळालं. ज्वालामुखीतून निघणाऱ्या धूराने त्या परिसराला वेढलं होतं. आकाशात उंचच उंच धुराचा काळोख बघायला मिळत होता. ज्वालामुखीतून राखही बाहेर येत होती. ज्वालामुखी म्हटलं की काळजाचा थरकाप उडतो. लाव्हारसाचे तप्त लाल गोळे डोळ्यासमोर येतात. ज्वालामुखीचं हे रौद्र रुप सर्वपरिचयाचं आहे. जेव्हा तिथला ज्वालामुखी सक्रीय झाला तेव्हा त्या परिसरातील रहिवाशांना परिसर खाली करण्यास सांगण्यात आलं. सर्वांना घरं सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आलं. आणि सर्वांना ज्वालामुखीची कल्पना देण्यात आल्यावर परिसर खाली करण्यास सुरूवात झाली. पण अशा सगळ्या वातावरणात जिथे जीव वाचवण्यासाठी सर्वांची पळापळ सुरु होती तिथे एक जोडपं मात्र चक्क लग्नाच्या विधीमध्ये व्यस्त होतं. मागे ज्वालामुखीचा उद्रेक आणि समोर लग्नाचा विधी रविवारची हि घटना, ताल ज्वालामुखीचा उद्रेक झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर असलेला परिसर सर्व रहिवासी खाली करत होते. वरती आकाश धुराच्या काळ्या ढगांनी व्यापलं गेलं होत. राख बाहेर पडत होती, तिथे अलर्टही घोषित करण्यात आला होता.आणि याच ठिकाणी तिथेच छान लग्नासाठी तयार झालेली नवरा नवरीची जोडी आपला लग्नाचा विधी पुर्ण करण्यात मग्न होती. लग्नाचे फोटो बघुन वाटेल आश्चर्य फिलिपाइन्समध्ये राहणारी मपगलद आणि कैट वैलफ्लोर यांचा रविवारी सर्वांना चकित करणारा विवाह पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो बघुन कुणालाही आश्चर्य तर वाटेलच पण धक्काही बसेल. जिथे हि नवरा-नवरीची जोडी लग्नाचे फोटो काढण्यासाठी पोज देत होती तिथेच त्यांच्या मागे आसंमत ज्वालामुखीच्या धुराने भरुन गेला होता. आगीचे लोळही काही फोटोंमध्ये दिसत आहेत. ज्वालामुखीच्या भीतीने जीथे सर्वांना भीतीची धडकी भरली होती तिथे विवाह बंधणात अडकणाऱ्या या नवरा-नवरीचे लग्नाचे फोटे पाहिले तर त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा साधा लवलेशही दिसत नाही. ते या फोटोंमध्ये खूप खूश दिसत आहेत. लग्नात आलेली पाहुणे मंडळी देखील खुप आनंदीत बघायला मिळत आहे. हि सगळी मंडळी ज्वालामुखीच्या उद्रेकापासून अनभिज्ञ असल्याचं बघायला मिळतय. हा फोटो सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ज्वालामुखीबद्दल कल्पना असतानाही लग्न करायचा निश्चय केला ज्यांच्या लग्नाचा फोटो बघून सध्या आश्चर्य व्यक्त होत आहे त्या नवरा-बायको सोबत बोलणं झालं तेव्हा त्यांना या भयानक ज्वालामुखीबद्दल माहिती होतं असं त्यांनी सांगितलं. ज्वालामुखीच्या बातमीमुळे आम्ही थोडे नाराजही होतो. अलर्ट जारी करण्यात आल्याविषयी देखील कल्पना होती. पण तरिदेखील आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. ज्वालामुखीच्या जवळ एक किलोमीटर उंच राखेची भींत दिसत होती आणि आसपासच्या परिसरातही ज्वालामुखीचे तीव्र झटके जाणवत होते.जानेवारी 2018 मध्ये माउंट मेयन मधुन निघालेली राख आणि लाव्हामुळे त्याठिकाणच्या हजारो नागरिकांना विस्थापित व्हावं लागलं होतं. तज्ञांच्या मते लाव्हा ताल ज्वालामुखीच्या दिशेने येत होता. मनीला पासून 65 किलोमीटर स्थित असलेला हा ज्वालामुखी त्या देशातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी आहे आणि शेवटच्या वेळी 1977 मध्ये इथे स्फोट झाला होता.असा भयंकर ज्वालामुखी सक्रिय झालेला असताना आपला विवाह ठरलेल्या वेळी कऱण्याच्या धाडसी निर्णयामुळे या जोडप्याचं लग्न सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
First published:

पुढील बातम्या