Vodafone आणि Ideaच्या 'या' स्पेशल प्लॅनवर मिळणार दररोज अतिरिक्त 400 एमबी डेटा

टेलिकॉम कंपनी वोडाफोन आणि आयडीया यांनी आपल्या ग्राहाकांसाठी शानदार ऑफर आणल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2019 07:17 PM IST

Vodafone आणि Ideaच्या 'या' स्पेशल प्लॅनवर मिळणार दररोज अतिरिक्त 400 एमबी डेटा

मुंबई, 18 जुलै : टेलिकॉम कंपनी वोडाफोन आणि आयडीया यांनी आपल्या ग्राहाकांसाठी शानदार ऑफर आणल्या आहेत. यात ग्राहकांना दररोज 400 एमबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे. दरम्यान ही ऑफर केवळ 399 आणि 499च्या रिचार्जवर उपलब्ध असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हा अतिरिक्ट डेटा दोन्ही प्लॅनमध्ये मिळणारऱ्या डेटामध्ये समावेश करण्यात येणार आहे.

दरम्यान ही ऑफर फक्त वोडाफोन ग्राहकांसाठी नव्हे तर आयडीया वापरणाऱ्या ग्राहकांसाठीही आहे. दरम्यान वोडाफोननं आपल्या ग्राहकांसाठी ही सुविधा 399च्या रिचार्जवर उपलब्ध करून दिली आहे.

अशी आहे वोडाफोनची नवी ऑफर

वोडाफोनच्या 399च्या रिचार्जवर आधी एक जीबी डेटा मिळत होता. आता नवी ऑफरनुसार ग्राहकांना त्याच रिचार्जवर 400 एमबी अतिरिक्त डेटा दररोज मिळणार आहे. त्यामुळं 399चा रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना आता 1.4 जीबी डेटा मिळणार आहे.

वोडाफोनचा 299ची नवी ऑफर

Loading...

वोडाफोननं नव्याने आणलेल्या 299च्या या ऑफरमध्ये अनलिमिटेड लोकल कॉल, एसटीडी टॉकटाईम या सोबत 2 जीबी डेटा मोफत मिळणार आहे. याशिवाय ग्राहकांना 100 एसएमएसही मोफत मिळणार आहेत. त्यामुळं ही ऑफरही ग्राहकांसाठी लाभदायक आहे.

वाचा- मोबाईल गरम होत असेल तर करा 'हे' उपाय!

अशी आहे आयडियाची नवी ऑफर

आयडिया कंपनीच्या 499च्या रिचार्जवर ग्राहकांना याआधी 2 जीबी डेटा मिळत होता. आता नव्या ऑफरनुसार ग्राहकांना 2.4 जीबी डेटा मिळणार आहे.

असा मिळणार लाभ

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना मोबाईल अॅपवरून रिचार्ज करावे लागणार आहे. वोडाफोन ग्राहक माय वोडाफोन या अॅपवरून तर, आयडिया ग्राहक My Idea Recharge या अॅपवरून रिचार्ज करू शकतात.

वाचा- या अनोख्या उपायानं दूर करू शकता विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण

वाचा- या घरगुती उपायांनी निरोगी ठेवा तुमची किडनी

VIDEO : कंत्राटी शिक्षकांवर पाण्याचा मारा आणि लाठीचार्ज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 05:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...