विश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात

विश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात

कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात झालाय. या अपघातात नांगरे पाटील किरकोळ जखमी झाले.

  • Share this:

29 मे : कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात झालाय. या अपघातात नांगरे पाटील किरकोळ जखमी झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी विश्वास नांगरे पाटील विमानतळाकडे जात होते. शहरापासून  विमानतळ रोडकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला.  गाडीवरचा ताबा सुटल्यामुळे रस्त्यावरून खाली घसरली आणि रस्त्यालगत खड्ड्यात पडली.  सुदैवाने या अपघातात विश्वास नांगरे पाटील यांना कोणतीही मोठी दुखापत झाली. त्यांना किरकोळ जखम झाली. त्यांच्यासह तिघेजण सुखरूप आहे.

First published: May 29, 2017, 7:54 PM IST

ताज्या बातम्या