कोल्हापूर, 04 जुलै : पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांना कायमच ताणतणावाला सामोरे जावे लागते त्यातून तंदुरुस्त राहण्याकडे, व्यायामाकडे आणि आहाराकडे पोलिसांचं कायम दुर्लक्ष होतं पण कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पोलिसांना फिटनेस ठेवा आणि हवं तिथं पोस्टिंग मिळवा अशी ऑफर देऊ केलीये.
पोलीस दलामध्ये आजही जास्त वजन असलेले अनेक कर्मचारी कार्यरत आहेत त्यांनाही वजन कमी करण्यासाठी आवाहन करत जिथं हवं तिथं पोस्टिंग द्यायची घोषणा विश्वास नागरे पाटील यांनी केलीये.
मुलं चोरणाऱ्या टोळीचं हे आहे खरं सत्य!
कोल्हापूर परिक्षेत्रमध्ये सध्या हा उपक्रम सुरू करण्यात आला असून राज्यभरातले अनेक अधिकारी आणि कर्मचारी कोल्हापूर परिक्षेत्रमध्ये सध्या बदली होऊन दाखल झालेत तसंच अनेक कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी आहेत. त्यांना सोयीस्कर बदली हवी असेल तर यापुढे स्वतःचा फिटनेस ठेवावा लागणार आहे.
अलिबागमध्ये एकाच कुटूंबातल्या पाच जणांनी घेतलं विष, सर्वांची प्रकृती गंभीर
अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना वेगवेगळे आजार असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे, मात्र आता नांगरे पाटील यांच्या आवाहनामुळे पोलिसांचं आरोग्य सुधारणार आहे असंच म्हणावे लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Vishvas nangre patil