मोदी तुमच्या राज्यात एका तरी बलात्कारीला फाशी मिळाली का? विशाल ददलानीचा प्रश्न

निर्भयाचे बलात्कारी, आसिफाचे बलात्कारी एवढंच नाही तर उन्नाव चाइल्ड रेपमधील बलात्कारी भाजपचे आमदार सेंगर अजून जिवंत आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 1, 2019 06:02 PM IST

मोदी तुमच्या राज्यात एका तरी बलात्कारीला फाशी मिळाली का? विशाल ददलानीचा प्रश्न

नवी दिल्ली, ०१ फेब्रुवारी २०१९- बुधवारी सूरतमध्ये युथ कॉन्क्लेवमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं काही विधान केलं की त्याची चर्चा ट्विटरवर सुरू झाली. त्यांच्या या वक्तव्यावर ट्विटरवर त्यांना अनेक नकारात्मक कमेंटही आल्या.

मोदी म्हणाले होते की, ‘आधीही या देशात बलात्कार व्हायचे. ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे. आताही अशा गोष्टी ऐकायला येत आहेत. पण आता गुन्हेगारांना ३ दिवसांत, ७ दिवसांत, ११ दिवसांत आणि १ महिन्याच्या आत फाशी देण्यात येते. आपल्या मुलींना न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आता त्याचे परिणामही समोर येत आहेत.’
Loading...

पंतप्रधानांच्या या वक्तव्याला रिट्वीट करत अनेकांनी त्यांची निंदा केली. बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक विशाल दादलानीने मोदींच्या या वक्तव्यावर त्यांना सोशल मीडियावरच प्रश्न विचारला. तसंच बलात्काऱ्यांना तात्काळ देण्यात येणाऱ्या फाशीबद्दल ते खोटं बोलत असल्याचंही म्हटलं.

विशालने ट्विट करत म्हटलं की, ‘खोटं सर, मला एखाद्या बलात्कारी गुन्हेगाराचं नाव सांगा ज्याला तुमच्या राज्यात फाशी देण्यात आली आहे. निर्भयाचे बलात्कारी, आसिफाचे बलात्कारी एवढंच नाही तर उन्नाव चाइल्ड रेपमधील बलात्कारी भाजपचे आमदार सेंगर अजून जिवंत आहे.’
विशाल दादलानी पुढे म्हणाला की, ‘नरेंद्र मोदी, मला माहितीये की निवडणुका जवळ आल्या आहेत. पण यासाठी तुम्ही भारतीय महिलांची प्रतारणा करू नका.’

Union Budget 2019 : मोदींच्या दृष्टीने असा आहे अर्थसंकल्प


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2019 06:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...