Elec-widget

पहिल्यांदा इथे भेटले होते विराट कोहली आणि अनुष्का शर्मा, पहिल्याच भेटीत बोलावलं होतं घरी

गेल्या अनेक महिन्यांपासून अनुष्का कोणत्याही सिनेमाचं चित्रीकरण करताना दिसत नाहीये. ती सध्या पती विराट कोहलीसोबत आयपीएलच्या सामन्यांमध्ये त्याला चिअर करताना दिसते.

  • Share this:

उद्या १ मे रोजी अनुष्का शर्मा तिचा ३१ वा वाढदिवस साजरा करणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अनुष्का कोणत्याही सिनेमाचं चित्रीकरण करताना दिसत नाहीये. ती सध्या पती विराट कोहलीसोबत आयपीएलच्या सामन्यांमध्ये त्याला चिअर करताना दिसते.

विराटही अनुष्कापासून फार लांब राहू शकत नाही. त्यांच्या लग्नाला दोन वर्ष जरी झाली असली तर त्या दोघांचं एकमेकांसाठीचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. अनुष्काच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांची लव्हस्टोरी सांगतो.

ऑगस्ट २०१३ मध्ये एका शॅम्पूच्या जाहिरातीच्यावेळी विराट आणि अनुष्का यांची पहिल्यांदा ओळख झाली. यानंतर दोघं फार चांगले मित्र झाले. अनेक कार्यक्रमांना दोघं एकत्र दिसू लागले होते. त्या दोघांच्या नात्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये होत होती. मात्र दोघांनी त्यांच्या नात्याला फक्त मैत्रीचंच नाव दिलं.

Loading...

अनुष्काने स्वतः मान्य केलं होतं की, ‘शॅम्पूच्या जाहिरातीचं शूटिंग तीन दिवस सुरू होतं. शुटिंगच्या दुसऱ्या दिवशी मी माझ्या मित्रांना नवीन घर घेतल्याच्या आनंदात रात्रीच्या जेवणाला बोलावलं होतं. तेव्हा विराटलाही बोलावलं. तेव्हापासून हे गॉसिप सुरू झालं. त्या पार्टीत दुसरे लोकही होते पण त्याची बातमी झाली नाही.’

एका मुलाखतीत विराटचं कौतुक करताना अनुष्का म्हणाली की, ‘मी त्याच्याशी उद्धटपणे वागत होती. कारण मला वाटत होतं की तोही उद्धट आहे. पण जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा मला कळलं की तो साधा, हुशार आणि आयुष्य मनमुरादपणे जगणारा आहे.’

खूप वर्ष दोघांनी आपलं नातं प्रसारमाध्यमांशी लपवून ठेवलं होतं. २०१४ मध्ये इंडियन सुपर लीग सामन्यांदरम्यान दोघं एकत्र स्टेडियमवर दिसण्यात आले होते.

नोव्हेंबर २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात जेव्हा विराट फलंदाजी करत होता, तेव्हा अनुष्काही तो सामना पाहायला गेली होती. शतक झळकावल्यानंतर विराटने आपली बॅट हवेत अनुष्काच्या दिशेने उंचावली आणि तिला फ्लाइंग किस दिले.

दोघांनी ११ डिसेंबर २०१७ मध्ये लग्न केलं. दोघांनी फ्रान्समध्ये अवघ्या ४५ लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यांचे लग्नातले फोटो आजही सोशल मीडियावर कमालिचे व्हायरल होत असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2019 06:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...