• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • कसं शक्य आहे? नर शार्कशिवायच झाला पिल्लाचा जन्म; 2 मादी माशांचा चमत्कार; शास्त्रज्ञही हैराण

कसं शक्य आहे? नर शार्कशिवायच झाला पिल्लाचा जन्म; 2 मादी माशांचा चमत्कार; शास्त्रज्ञही हैराण

या घटनेने आता शास्त्रज्ञांचीही (scientists) मती गुंग झाली आहे.

 • Share this:
  या जगात तुम्ही अनेक वेळा चमत्कार (miracles in world) पाहिले असतील. काही गोष्टी अशा घडतात की त्यांच्यावर विश्वास ठेवणंही कठीण असतं. अशा अविश्वसनीय गोष्टींना चमत्कार म्हणतात. अशा अनेक घटना समोर येत राहतात. पण त्या सत्य असतात. त्यांना नाकारलं जाऊ शकत नाही. अशीच एक चमत्काराची घटना इटलीत घडली आहे. इटलीत (viral news in Italy) नराच्या शुक्राणू (birth without male sperm) शिवाय एक जीव जन्माला आला आहे. या घटनेने आता शास्त्रज्ञांचीही (scientists) मती गुंग झाली आहे. इटलीच्या सार्डिनिया येथील एका टाकीत दोन मादी (females) शार्क (shark) माशांनी एका शार्कला जन्म दिला आहे. हा जन्म म्हणजे एक चमत्कारच आहे. याचं कारण म्हणजे मागील 10 वर्षांपासून टाकीमध्ये एकही पुरुष शार्क शिल्लक राहिलेला नाही. या शार्कचा जन्म दोन मादी माशांपासून झाला आहे. विशेष म्हणजे शुक्राणूशिवाय झालेला शार्कचा हा जन्म विज्ञानासाठी एक कोडंच बनलं आहे. हे वाचा - लस घ्यायला इतके नखरे! वैतागलेल्या मित्रांनी जमिनीवरच आपटलं आणि...VIDEO VIRAL दोन मादी माशांपासून या शार्कचा जन्म होण्याच्या प्रक्रियेला 'व्हर्जिन बर्थ' (Virgin Birth) म्हटलं जात आहे. या शार्कच्या जन्माची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी हा जन्म म्हणजे येशू (Jesus) परत आल्याचे संकेत असल्याचं म्हटलं आहे. या बेबी शार्कला इस्पेरा (Espera) असं नाव देण्यात आलं आहे. इस्पेराचा जन्म एक्क्वेरियो डी काला गोनोन मस्यालयात झाला. इस्पेराचा जन्म झाला तिथे फक्त दोन मादी मासे 10 वर्षांपासून आहेत. जगातील पार्थेनोजेनेसिसचं हे पहिलंच प्रकरण असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. शुक्राणूशिवाय गर्भाशयात गर्भ तयार होणे याला पार्थेनोजेनेसिस म्हटलं जातं. याबाबतची बातमी सोशल मीडियावर शेअर होताच ती वेगाने व्हायरल झाली. सोशल मीडियावर अनेकांनी इस्पेराच्या जन्मावर भाष्य केलं. इस्पेराचा जन्म म्हणजे येशू पृथ्वीवर आला आहे, असं एका युजर्सने म्हटलं. याबाबत शास्त्रांनी सांगितलं की, समुद्रात काही शार्क आहेत, जे कोणत्याही नराच्या मदतीशिवाय गर्भवती होऊ शकतात. पण याचा पुरावा कधीच सापडला नाही. हे दोन शार्क 10 वर्षांपासून टाकीत असल्याने, हा त्यांच्या गर्भधारणेचा पुरावा आहे. त्याला धर्माशी किंवा येशूच्या अवताराशी जोडण्याची गरज नाही. हे वाचा - अजबच! घटस्फोटानंतर महिलेने ठेवली Divorce Party; म्हणाली, 'आता मी स्वतंत्र.... ' आतापर्यंत शार्कच्या काही प्रजाती सापडल्या आहेत ज्या नरांच्या मदतीशिवाय गर्भवती होऊ शकतात, असं अमेरिकेतील फ्लोरिडामधील मोटे मरीन लॅबोरेटरी अँड अॅक्वेरियमच्या संचालकांनी लाइव्ह सायन्सशी बोलताना सांगितलं. जेव्हा मादीला गर्भवती होण्यासाठी पुरुष मिळत नाही, तेव्हा ती पार्थेनोजेनेसिसद्वारे गर्भधारणा करते, असं त्यांनी म्हटलं आहे.
  First published: