शहीद जवानाचे वडिल म्हणाले, नातवंडही लढायला पाठवू; वीरूने केला या 'बाप'माणसाला सलाम

शहीद जवानाचे वडिल म्हणाले, नातवंडही लढायला पाठवू; वीरूने केला या 'बाप'माणसाला सलाम

या चकमकीत शहीद झालेल्या साहरसा इथल्या कुंदन कुमार याच्या वडिलांचा एक व्हिडिओ वीरूनं शेअर केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जून : भारत चीन सीमेवर लडाखमधल्या गलवान खोऱ्यात परवा रात्रीपासून सुरू असलेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. चीनच्या बाजूचंही या हिंसक वादात नुकसान झालं आहे. जिवाची बाजी लावून चीनची घुसखोरी आणि उद्दामपणा परतवून लावणाऱ्या 20 सैनिकांची यादी लष्कराने जाहीर केली आहे. या चकमकीत भारतीय लष्कराचे कर्नल संतोष बाबू (Col. Santosh Babu) शहीद झाले आहेत. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) इन्स्टाग्रामवर त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली.

या चकमकीत शहीद झालेल्या साहरसा इथल्या कुंदन कुमार याच्या वडिलांचा एक व्हिडिओ वीरूनं शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कुंदनचे वडिल म्हणतात की, 'माझ्या मुलानं देशसेवेसाठी बलिदान दिलं आहे. माझी 2 नातवंड आहेत त्यांनादेखील मी सीमेवर पाठवण्यासाठी तयार आहे' त्यांचा हा व्हिडिओ शेअर करत 'हे आहेत ईश्वररुपी माणूस...चीनला लवकरच आरसा दाखवण्यात येईल' असं म्हणत वीरुने त्यांच्या धैर्याचं कौतूक केलं आहे.

वीरेंद्र सेहवागने संतोष बाबूंचा फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये लिहिलं की, 'गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या कर्नल संतोष बाबूबद्दल मनापासून संवेदना. यावेळी जेव्हा जग साथीच्या रागाचा सामना करत आहे. अशात ही शेवटची गोष्ट होती. ज्याची आम्हाला गरज होती. मी आशा करतो की चीनी सुधारेल.'

भारत-चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये चीन सैन्याच्या कमांडिंग ऑफिसरचा मृत्यू झाल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिली आहे. लडाख भागातील पेनगॉंग सो येथे झालेल्या 5 मे पासून वाद सुरू आहेत. सोमवारी झालेल्या हिंसाचारात चीनच्या 65 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर भारताचे 80 जवान जखमी असून 4 जणांची प्रकृती गंभीर आहे.

गलवात खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर त्याचा निषेध करण्यासाठी अनेक भागांमध्ये मोर्चे आणि आंदोलन करण्यात आले. या हिंसाचारात जखमी झालेल्या 4 जवानांची स्थिती गंभीर असल्याची माहिती आहे.

या परिसरात 1962 साली 33 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून सीमावाद धुमसत होता. त्यामधून सोमवारी रात्री धुमश्चक्री झाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय मीडियानेही भारत-चीन प्रकरणाला महत्त्व दिल्याचं दिसून आलं. पाकिस्तानच्या डॉनपासून ते गार्डियन, वॉशिंग्टन पोस्ट, सीएनन, न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी यांनी कोणत्याही एका देशाची बाजू न घेता या प्रकरणावर भाष्य केलं.

First published: June 17, 2020, 11:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या