IPL 2019 : आऊट झाल्यानंतर या 'जॉस बटलर'नं मैदानात तोडली बॅट, VIDEO व्हायरल

पंजाब आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाबचा कर्णधार आर अश्विननं जॉस बटलरला ज्या पद्धतीने बाद केलं, त्यावरून सोशल मीडियात टोकाच्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 26, 2019 09:43 PM IST

IPL 2019 : आऊट झाल्यानंतर या 'जॉस बटलर'नं मैदानात तोडली बॅट, VIDEO व्हायरल

जयपूर, 26 मार्च : आयपीएलच्या 12व्या हंगामाला सुरूवात होऊन तीन दिवसचं झाले असताना, एका नवीन वादाला सुरूवात झाली आहे. पंजाब आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाबचा कर्णधार आर अश्विननं जॉस बटलरला ज्या पद्धतीने बाद केलं, त्यावरून सोशल मीडियात टोकाच्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. यातच सोशल मिडीयावर काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यातच लोहगाव येथे सुरू असलेल्या राष्ट्रवादी चषक सामन्यात एक गोलंदाजानं फलंदाजाला अश्विन स्टाईल म्हणजे मकडिंग पध्दतीने आऊट केलं. त्यावर या महाराष्ट्राच्या बटलरनं रागात आपली बॅटचं तोडली.मंकड आऊट म्हणजे काय?

40च्या दशकात भारताकडून खेळणारा सलामीवीर होता विनू मंकड. विनू मंकड डावखुरा स्लो बोलर म्हणूनही खेळत असे. भारताचा हा अष्टपैलू महान खेळाडू 1947-48 दरम्यान अशाच पद्धतीच्या वादात अडकला होता. त्या वेळी भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विनू मंकडने बिल ब्राऊन या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला वेगळ्याच पद्धतीने आऊट केलं. बिल नॉन स्ट्राईकिंग एंडला असतानाच बोलिंग करत असलेल्या मंकडने अचानक बेल्स उडवल्या. क्रिकेटच्या नियमाप्रमाणए क्रीजमध्ये नसल्याने बिल ब्राऊन आऊट झाला.

Loading...

यावरून ऑस्ट्रेलियाच्या संघाने थैमान घातलं. ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांनीही भारतीय गोलंदाज कसा चुकीचं वागला याबद्दल लिहून विनू मंकड यांच्याविरोधात रान उठवलं. आजही हे यापद्धतीनं धावबाद करणं खेळाच्या उस्फूर्त भावनेच्या विरोधात असल्याचं मानलं जातं. अशा पद्धतीने आऊट झालं की मंकड डिसमिसल असं म्हटलं जात. मंकडिंग असं क्रियापदच क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये रूढ झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 09:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...