‘झिरो’ सिनेमाचं कौतुक करताच ट्रोल झाला विराट, युझर्सने विचारलं ‘याचसाठी पाठवलं का ऑस्ट्रेलियाला?’

‘झिरो’ सिनेमाचं कौतुक करताच ट्रोल झाला विराट, युझर्सने विचारलं ‘याचसाठी पाठवलं का ऑस्ट्रेलियाला?’

एकामागोमाग एक नंतर अनेकांनी विराटला ट्रोल करायला सुरुवात केली.

  • Share this:

मुंबई, २३ डिसेंबर २०१८- आनंद एल राय दिग्दर्शित शाहरुख खान अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ स्टारर ‘झिरो’ सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. प्रेक्षकांसोबत सेलिब्रिटींनाही ‘झिरो’ सिनेमा आवडत असल्याचं दिसत आहे. सगळेच स्टार या सिनेमावर आपलं मत नोंदवत आहेत. अशावेळी जर आपल्या पत्नीचाच सिनेमा असेल तर कौतुक करण्यात विराट कोहली कसा काय मागे राहीलं.

विराट कोहली सध्या संपूर्ण संघासोबत  कसोटी मालिकेसाठी मेलबर्नमध्ये आहे. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध २६ डिसेंबरला तिसरा कसोटी सामना खेळायचा आहे. संघाकडे सध्या वेळ आहे. यामुळेच विराटने मेलबर्नमध्ये वेळात वेळ काढून ‘झिरो’ सिनेमा पाहिला. विराटने फक्त हा सिनेमा पाहिलाच नाही तर अनुष्काच्या अभिनयाचं भरभरुन कौतुक केलं.

विराटने सोशल मीडियावर लिहिलं की, ‘मी ‘झिरो’ सिनेमा पाहिला आणि मला फार आवडला. सगळ्यांनी सिनेमात चांगलं काम केलं आहे. अनुष्काचं काम मला फार आवडलं. तिने साकारलेली व्यक्तीरेखा करणं फार कठीण आहे. पण तिने फार चांगलं काम केलं.’

विराटने सिनेमाचं कौतुक केलं असलं तरी तो याचमुळे ट्रोलही झाला आहे. एका युझरने विराटच्या ट्विटला कमेंट करताना म्हटलं की, ‘विराट ही बायकोची असणारी भीती बोलत आहे.’ दुसऱ्या एका युझरने लिहिले की,’हेच करायला तुला ऑस्ट्रेलियाला पाठवलेलं का?’

तर अजून एका युझरने लिहिले, ‘लडकी का चक्कर बाबू भाय.. लडकी का चक्कर.’ एकामागोमाग एक नंतर अनेकांनी विराटला ट्रोल करायला सुरुवात केली. एका युझरने तर विराटवर खोटं बोलण्याचा आळ टाकत ‘अनुष्काचं मन राखण्यासाठी खोटं का बोलतोस?’ असा सरळ प्रश्न विचारला.

२०१८ हे वर्ष अनुष्कासाठी फार व्यग्र होतं. यावर्षी तिचे ‘झिरो’ व्यतिरिक्त तीन सिनेमे प्रदर्शित झाले. ‘परी’ सिनेमात ती डायन झाली होती, ‘संजू’ सिनेमात तिने लेखिकेचं काम केलं होतं तर ‘सुई धागा’ सिनेमात तिने सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या एका महिलेची व्यक्तिरेखा साकारली होती. तीनही सिनेमात तिने वेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या होत्या.

‘झिरो’ सिनेमाचं दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केलं आहे तर, सिनेमाची निर्मिती शाहरुख खानची पत्नी गौरी खानने केले आहे. शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ या त्रिकुटाने याआ’धी जब तक है जान’ या सिनेमात एकत्र काम केलं आहे.

First published: December 23, 2018, 8:15 PM IST

ताज्या बातम्या