जेव्हा ‘या’ भारतीय खेळाडूची बॅट तळपते, तेव्हा भारताचा विजय पक्काच असतो

ही मालिका वर्ल्ड कपच्याआधीची शेवटची मालिका असल्यामुळे दोन्ही संघ आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतील यात काही शंका नाही.

News18 Lokmat | Updated On: Feb 24, 2019 07:20 PM IST

जेव्हा ‘या’ भारतीय खेळाडूची बॅट तळपते, तेव्हा भारताचा विजय पक्काच असतो

आज 24 फेब्रुवारीपासून टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना विशाखापट्टनम येथे तर दुसरा सामना बंगळुरू येथे खेळण्यात येणार आहे.

टी२० मालिकेनंतर टीम इंडिया कांगारूंविरुद्ध ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका वर्ल्ड कपच्याआधीची शेवटची मालिका असल्यामुळे दोन्ही संघ आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतील यात काही शंका नाही.

हे तर झालं संघाचं पण, इथे आपण अशा भारतीय खेळाडूबद्दल बोलतोय ज्याला ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाच्या गोलंदाजांना धूळ चारायला मजा येते. टीम इंडियाचा हा खेळाडू दुसरा तीसरा कोणी नसून आक्रमक कर्णधार विराट कोहली आहे.

Loading...

आतापर्यंत विराटने ६५ टी20 सामने खेळले. यात त्याने 49.25 च्या सरासरीने 19 अर्धशतकांच्या मदतीने 2167 धावा केल्या.

ऑस्ट्रेलिया संघासमोर विराटची बॅट नेहमीच तळपली आहे. कांगारूंच्या विरोधात विराटने आतापर्यंत 14 सामन्यांमध्ये 61 च्या सरासरीने 488 धावा केल्या असून यात 5 अर्धशतकांचा समावेश आहे. क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी20 मध्ये 500 धावा करणारा विराट हा एकमेव खेळाडू आहे.

विशेष म्हणजे, विराटची सर्वोत्तम खेळी ही ऑस्ट्रेलियाविरुद्धचीच आहे. त्याने ९० धावांची नाबाद खेळी याच संघाविरुद्ध खेळली होती. २६ जानेवारी २०१६ मध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात कोहलीने 55 चेंडूमध्ये 9 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर धावांचा डोंगर रचला होता. एवढचं नाही विराट त्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कारही त्याने पटकावला होता.

विराटने २०१६ मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांत मेलबर्नमध्ये नाबाद 59 धावा, सिडनीमध्ये 50 धावा, मोहालीमध्ये नाबाद 82 धावा आणि सिडनीमध्येच 61 धावांची चमकदार खेळी खेळली होती.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा विराटने कांगारूंविरूद्ध अर्धशतक ठोकलं, तेव्हा टीम इंडीयाने प्रत्येक सामना जिंकला आहे. आजपर्यंत दोन्ही संघ 18 वेळा आमने सामने आले आहेत. यापैकी 11 वेळा भारताने कांगारूंना धुळ चारली आहे.

भारतामध्ये खेळलेल्या सामन्यांचा विचार केला तर इथेही ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड खूप खराब आहे. ऑस्ट्रेलियाने भारतात आजपर्यंत चार टी20 सामने खेळले गेले त्यातील तीन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला. 10 ऑक्टोबर 2017 मध्ये गुवाहाटी येथे खेळलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 8 विकेट राखून जिंकले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2019 07:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...