• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • 19 सिक्सर! विराट कोहलीच्या टीमला मिळाला IPL जिंकून देऊ शकेल असा हुकमी एक्का

19 सिक्सर! विराट कोहलीच्या टीमला मिळाला IPL जिंकून देऊ शकेल असा हुकमी एक्का

विराट कोहलीच्या RCB साठी मॅच विनर ठरू शकतो टिम डेव्हिड

विराट कोहलीच्या RCB साठी मॅच विनर ठरू शकतो टिम डेव्हिड

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली RCB संघाला एक नवा हिरा गवसला आहे. CPL 2021 च्या निमित्ताने हा 19 षटकार ठोकणारा खेळाडू हिरो होऊ शकतो याची जाणीव झाली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर: क्रिकेटच्या इंडियन प्रीमिअर लीगचा दुसरा टप्पा (IPL Second Phase) सुरू होण्यास केवळ 2 दिवस बाकी आहेत. या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्या सामन्याने होणार आहे. तसंच विराट कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) 20 सप्टेंबरला रात्री कोलकाता नाइट रायडर्सशी (KKR) लढणार आहे. या सामन्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्सला (RCB) एक मोठी खूशखबर मिळाली आहे. खरं तर, दुसऱ्या टप्प्यासाठी या संघात सामील झालेला क्विक हिटर टिम डेव्हिड (Tim David) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि बेंगळुरूला प्रथमच आयपीएलचं (IPL) विजेतेपद मिळवून देण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. सिंगापूरचा हा क्रिकेटर कॅरेबियन प्रीमिअर लीग 2021मध्ये (CPL 2021) खेळत होता. आपल्या जबरदस्त बॅटिंगे त्यानं या लीगमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली होती. टिम डेव्हिडनं CPL मध्ये तडाखेबंद बॅटिंग करून 11 डावांमध्ये 282 रन्स केले होते. मिडल ऑर्डरमध्ये (Middle Order) खेळणारा हा बॅट्समन सरासरी 35 पेक्षा अधिक रन्स काढण्यात यशस्वी ठरला होता. त्यामुळे डेव्हिडचा स्ट्राइक रेट (Strike Rate) 140 पेक्षा अधिक राहिला. या टुर्नामेंटमध्ये टिम डेव्हिडनं निम्म्याहून अधिक रन्स फोर (Four) आणि सिक्सच्या (Six) माध्यमातून केले. 282 पैकी 190 रन्स डेव्हिडनं फोर आणि सिक्सच्या माध्यमातून केले आहेत. या डावांमध्ये टिम डेव्हिडनं 19 सिक्स आणि 19 फोर लगावले होते. टिम डेव्हिड आहे टी-20 स्पेशालिस्ट रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने अवघ्या 20 लाखांत टिम डेव्हिडला आपल्या टीममध्ये समाविष्ट करून घेतलं आहे. तो आरबीसीच्या सर्वांत स्वस्त विदेशी खेळाडूंपैकी एक मानला जातो.

Team India साठी मोठी बातमी! Virat Kohliने कर्णधारपद सोडलं

 सिंगापूरचा हा खेळाडू टी-20 (T20) स्पेशालिस्ट समजला जातो. मागील 9 महिन्यांत त्याने 6 क्रिकेट लीग खेळल्या आहेत. टिम डेव्हिड बिग बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीग, द हंड्रेड, टी-20 ब्लास्ट, कॅरेबियन प्रीमिअर लीग यांसारख्या प्रतिष्ठित क्रिकेट लीगमधून खेळला असून, या माध्यमातून त्यानं आपलं क्रिकेट कौशल्य सिद्ध केलं आहे.
टिम डेव्हिडची ताकद टिम डेव्हिड आपल्या तडाखेबंद बॅटिंगसाठी (Batting) ओळखला जातो. मैदानाच्या चौफेर मोठे सिक्सर्स मारण्यात तो पटाईत आहे. हीच बाब त्याच्या हिटिंगचं (Hitting) वैशिष्ट्य म्हणता येईल. बेंगळुरू टीममध्ये एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेलसारखे तुफानी बॅट्समन आहेत. त्यातच आता टिम डेव्हिडच्या समावेशामुळे आरसीबी अधिकच मजबूत होणार आहे. यूएईमध्ये घडणार नवा इतिहास, मलिंगाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी भारतीय स्पिनर सज्ज आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अॅडम जंपा, डॅनिअल सॅम्स, फिन एलेन, केन रिचर्डसन, वॉशिंग्टन सुंदर हे क्रिकेटर उपलब्ध नाहीत. आरसीबीनं त्यांच्या जागी वानेंदू हसारंगा, दुष्मंता चमीरा, टिम डेव्हिड, जॉर्ज गार्टन आणि आकाश दीपला टीममध्ये सहभागी करून घेतलं आहे.
First published: