या आजाराशी लढतेय अनुष्का शर्मा, देशासाठी वर्ल्ड कप खेळायला गेला विराट

या आजाराशी लढतेय अनुष्का शर्मा, देशासाठी वर्ल्ड कप खेळायला गेला विराट

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ यंदा वर्ल्डकपसाठी इंग्लंडला रवाना झाला. पहिला सामना सुरू झाल्यावर २० दिवसांनंतर खेळाडूंच्या पत्नी टूरवर जातील.

  • Share this:

मुंबई, 22 मे- बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा सध्या कंबरदुखीच्या आजाराने त्रस्त आहे. यावर उपचार घेण्यासाठी ती सध्या नावाजलेल्या डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आजारात फार वेळ बसल्यानंतर पाठ आणि कंबर दुखू लागते. तिचा हा आजार मणक्याच्या हाडाशी निगडीत आहे. सध्या ती फिजिओथेरपिस्टची ट्रिटमेंट घेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी अनुष्काला जास्तीत जास्त आराम करण्यास सांगितलं आहे.

...आणि एका क्षणात सुबोध भावेचं हे स्वप्न साकार झालं

अनुष्का मंगळवारी मुंबईत डॉक्टरांना भेटायला गेली होती. यानंतर अनेक ठिकाणी अनुष्काचे डॉक्टरांना भेटून आल्याचे फोटो व्हायरल झाले होते. अनुष्का अनेक दिवसांपासून या आजाराशी लढत आहे. अनेक वर्षांपासून अनुष्काला हा आजार सतावत होता. गेल्या काही महिन्यांमध्ये आजार वाढलाही होता. पण योग्य उपचारांनंतर आजारात सुधारणा झाली असून आता तिला बहुतांशी प्रमाणात आराम मिळाला आहे.

…म्हणून वयाच्या 14 व्या वर्षी शाहरुखच्या मुलाने सोडलं होतं घर

अनुष्काने गेल्यावर्षी शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबत झिरो सिनेमात काम केलं होतं. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा दणदणीत आपटला होता. यानंतर तिने एकाही सिनेमाचं चित्रीकरण केलेलं नाही. एकीकडे अनुष्काचा पाठीचा आजार बळावत आहे तर दुसरीकडे विराट वर्ल्डकपसाठी इंग्लंडला रवाना झाला. आयपीएल २०१९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर स्पर्धेतून बाद झाल्यानंतर अनुष्का आणि विराट अनेक दिवस एकत्रच होते. दोघं गोव्यात काही दिवस फिरायलाही गेले होते.

ती मला दारू पिऊन नेहमी मारायची, हॉलिवूडच्या सुपरस्टारने

काही इंग्रजी वृत्तपत्रांनी अनुष्का शर्मा डॉक्टरकडे गेल्याचे पाहून ती गरोदर असल्याचं म्हटलं होतं. पण यात काही तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं. विराट आणि अनुष्काने डिसेंबर २०१८ मध्ये लग्न केलं होतं. इटलीमध्ये दोघांनी डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. दोघांच्या लग्नात मोजून ४४ लोकच उपस्थित होते. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ यंदा वर्ल्डकपसाठी इंग्लंडला रवाना झाला. पहिला सामना सुरू झाल्यावर २० दिवसांनंतर खेळाडूंच्या पत्नी टूरवर जातील. बीसीसीआयने १५ दिवस पत्नींसोबत राहण्याची परवानगी दिली आहे. असं म्हटलं जातं की, २० जूननंतर अनुष्का शर्मा वर्ल्डकप पाहायला इंग्लंडला जाईल.

दुबईत तब्बल 20 हजार फुटांवरून या बॉलिवूड अभिनेत्रीने मारली उडी आणि...

SPECIAL REPORT : विवेक ओबेरॉयच्या मीमचा असा घेतला टि्वटरकरांनी बदला

First published: May 22, 2019, 5:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading