विराट कोहली इंस्टाग्रामच्या एका प्रमोशनल पोस्टवर तब्बल 3.2 कोटी कमावतो !

क्रिकेटच्या मैदानावर धावांची लयलूट करणारा जाहिरातबाजीतून करोडोंची कमावतोय तुम्हाला विश्वास बसणार नाही पण विराट कोहली त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील एका प्रमोशन पोस्टमागे तब्बल 3.2 कोटींची कमाई करतो.

Chandrakant Funde | Updated On: Nov 8, 2017 11:18 PM IST

विराट कोहली इंस्टाग्रामच्या एका प्रमोशनल पोस्टवर तब्बल 3.2 कोटी कमावतो !

मुंबई, 08 नोव्हेंबर : क्रिकेटच्या मैदानावर धावांची लयलूट करणारा जाहिरातबाजीतून करोडोंची कमावतोय तुम्हाला विश्वास बसणार नाही पण विराट कोहली त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील एका प्रमोशन पोस्टमागे तब्बल 3.2 कोटींची कमाई करतो. म्हणजेच समजा त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एखाद्या ब्रँडची जाहिरात केली तर त्याला प्रतिपोस्ट तब्बल 3.2 कोटी रुपये मिळतात. बिझनेस मॅगझीन फोब्सच्या माहितीनुसार विराटची कमाई जागतिक फूटबॉल पटू लिओनेल मेसीपेक्षाही अधिक आहे.

इंस्टाग्रामवर विराट कोहलीचे दीड कोटी फॉलोअर्स आहेत. ट्विटरवर विराटला तब्बल 2 कोटी फॉलोअर्स आहेत एवढंच नाहीतर त्याच्या फेसबूक पेजलाही तब्बल 3 कोटी 60 लाख फालो करतात. सोशल मीडियावरील कोहलीच्या या 'विराट' लोकप्रियतेमुळे साहजिकच त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्येही 'छप्परफाड' कमाई वाढलीय. अर्थात स्वतः विराट कोहली देखील सोशल मीडियावर इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा जरा जास्तच अँक्टिव्ह असतो. त्यामुळेच त्याच्या जाहिरातीच्या मानधनातही घशघशीत वाढ झालीय.

इंस्टाग्रामवरील ब्रँड प्रमोशनच्या कमाईत विराटचा दुसरा क्रमांक लागतो, तर पहिल्या क्रमांकावर आघाडीचा फूटबॉलपटू क्रिस्टियानो रोनॉल्डो आहे, त्याची कमाई एका पोस्टमागे 6.4 कोटी इतकी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 8, 2017 10:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close