क्रिकेटच नाही तर व्यवसायातही आहे विराट हिट, या स्टार्टअप्समधून कमावतो कोट्यवधी

नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार, इन्स्टाग्रामवर कोणतीही प्रमोशनल पोस्ट केली तर त्याला १.२० लाख डॉलर म्हणजेच जवळपास ८२ लाख रुपये मिळतात.

  • Share this:

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आज त्याचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. विराट फक्त क्रिकेटर नसून तो एक सुप्रसिद्ध सेलिब्रिटीही आहे. विराट जेवढा क्रिकेटर आहे तेवढाच तो उत्तम व्यावसायिकही आहे. एक उत्तम गुंतवणूकदार या नात्याने विराटने भविष्याचा विचार करता अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे. चला तर मग विराट कोहलीने नेमकी कोण कोणत्या बिझनेसमध्ये गुंतवणूक केली आहे.

विराटची कमाई- फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कोहलीने २०१८ मध्ये १६१ कोटींची कमाई केली आहे. यात २७ कोटी पगार आहे, ज्यात सामना जिंकून मिळालेल्या रक्कमेचा समावेश आहे. तर १३४ कोटी रुपये त्याने जाहिरातींतून कमावले आहेत.

विशेष म्हणजे फोर्ब्सच्या यादीत सहभागी होणारा विराट एकमेव भारतीय तसंच एकमेव क्रिकेटर आहे. फोर्ब्सने सांगितले की, कोहली सर्वात जास्त मैदाना बाहेर कमावतो. प्युमा, पेप्सी, ऑडी अशा अनेक ब्रँडचा अँम्बेसिडर आहे.

इन्स्टाग्रामवरून कमावतो  ८४ लाख- नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार, इन्स्टाग्रामवर कोणतीही प्रमोशनल पोस्ट केली तर त्याला १.२० लाख डॉलर म्हणजेच जवळपास ८२ लाख रुपये मिळतात.

सामन्यातून किती मिळते मिळकत- विराट कोहली टीम इंडियाचा ए प्लस कॅटेगरीमधला खेळाडू आहे. त्याची वर्षभराची रिटेनर फी ७ कोटी रुपये आहे. याशिवाय सामन्यात मिळणारी बक्षिसाची रक्कम, आयपीएलसारखे सामने यांचं मानधन वेगळं आहे.

फुटबॉल टीमचा मालक- क्रिकेटर म्हणून विराटची कमाई कोट्यवधींमध्ये आहे. मात्र तो आपल्या भविष्याबाबतीत फार सजग आहे. यामुळेच त्याने अनेक स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. आयएलएल टीम, एफसी गोवा यांसारख्या टीमचा मालक विराट आहे. एका समजुतदार सेलिब्रिटीप्रमाणे त्याने आयसीएलच्या टीममध्ये गुंतवणुक केली आहे. तसेच एफसी गोवाच्या टीममध्येही त्याची भागिदारी आहे.

दुबईतील आयटीपीएलमध्ये गुंतवणुक- विराटने यूएई रॉयल्सच्या मार्फत आयटीपीएलमध्ये गुंतवणुक केली आहे. लॉन टेनिसचा बादशहा रॉजर फेडररनेही यात गुंतवणूक केली आहे.

चिसेल जिम सेंटर- एवढंच नाही तर विराटची दिल्लीस्थित चिसेल जिम सेंटरमध्येही पार्टनरशिप आहे. असं म्हटलं जातं की, विराटने या जिम सेंटरमध्ये ९० कोटींची गुंतवणूक केली आहे. पुढील तीन वर्षांत विराटला देशभरात किमान ७५ चिसेल जिम सेंटर सुरू करायचे आहेत.

नुएवा रेस्टॉरंट- विराटने दिल्ली येथील आरकेपुरम परिसरात नुएवा हे हॉटेल सुरू केलं. दिल्लीच्या महत्त्वपूर्ण परिसरात असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये पंजाबीसोबतच अमेकिकन आणि अन्य कॉन्टिनेंटल डिश मिळतात.

Wrogn- विराटने Wrogn या प्रसिद्ध ब्रॅण्डमध्येही गुंतवणूक केली आहे. यूथ फॅशन ब्रॅण्डला प्रमोट करणारा हा प्लॅटफॉर्म अंजना रेड्डीने लॉन्च केला आहे. हा ब्रॅण्ड युनिव्हर्सल स्पोर्ट्सबिज प्रायव्हेट लिमिटेडशी जोडला गेला आहे. आपल्या फॅशन आणि स्टाइल स्टेटमेंटसाटी प्रसिद्ध असलेला कोहली अनेकदा Wrogn च्या जाहिरातींमध्ये दिसतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2018 08:45 PM IST

ताज्या बातम्या