• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • अनुष्का-विराटच्या लेकीला पाहिले का ? ; अष्टमीच्या शुभेच्छा देत केला लेकीचा फोटो शेअर

अनुष्का-विराटच्या लेकीला पाहिले का ? ; अष्टमीच्या शुभेच्छा देत केला लेकीचा फोटो शेअर

आजपर्यंत वामिकाला कुणीही नीट पाहिलेले नाही. आज मात्र नवरात्रीनिमित्त अष्टमीच्या शुभेच्छा देत अनुष्काने तिच्या लाडक्या लेकीसोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 13ऑक्टोबर: अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohali) यांच्या घरी 11 जानेवारी 2021 रोजी मुलीचे आगमन झाले आणि दोघेही आई बााब झाले. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने मुलीचं नाव वामिका (Vamika) ठेवलं आहे. तेव्हापासून आजपर्यंच बऱ्याचवेळा या दोघांनी त्यांच्या मुलीसोबत स्पॉट करण्यात आले आहे. मात्र आजपर्यंत वामिकाला कुणीही नीट पाहिलेले नाही. आज मात्र नवरात्रीनिमित्त अष्टमीच्या शुभेच्छा देत अनुष्काने तिच्या लाडक्या लेकीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. अनुष्का शर्मा इन्स्टावर लाडक्या लेकीसोबतचा एक गोड फोटो शेअर करत म्हटले आहे की, मला तु दररोज आधिक शूर आणि अधिक धैर्यवान बनवतेस. तुला अशीच शक्ती मिळुदे माझ्या लाडक्या वामिका ..असं म्हणत अनुष्काने सर्वांना अष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत व सोबत हार्टच्या इमोजी देखील शेअर केल्या आहेत.
  अनुष्का-विराटच्या मुलीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आजपर्यंत त्यांच्या मुलीचा फोटो समोर आलेला नाही. मात्र आज अनुष्काने मुलगू वामिकाचा फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अनेकांनी किती क्युट..दिसते अशा कमेंट देखील केल्या आहेत. वामिका मोठी झाल्याचे दिसत आहे. माया लेकिचा हा फोटो खुपच सुंदर आणि क्यूट आहे. वाचा : बाळ ठेवण्याचा निर्णय दोघांचा, जगाची पर्वा नव्हती ; नुसरत जहाँचा मोठा खुलासा कोणीही फोटो काढू नये याची सक्त ताकीद 11जानेवारी रोजी विराटनं सोशल मीडियावरून मुलगी झाल्याची गोड बातमी सर्वांना सांगितली होती. बाळाची सुरक्षा आणि प्रायव्हसी जपण्यासाठी विराट आणि अनुष्कानं कॅमेरासमोर येणं टाळलं होतं. अनुष्काने मुलिला जन्म दिला होता तेव्हा हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांना फोटो न काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. हॉस्पिटलमधील सुरक्षाही आधीपेक्षा अधिक कडक करण्यात आली होती. जे लोक आजूबाजूच्या रूम्समध्ये अॅडमिट आहेत त्यांना भेटायला येणाऱ्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना मुलीची झलक दिसू नये याची खास सोय करण्यात आली होती.
  Published by:News18 Trending Desk
  First published: