IPL मधून RCB बाद झाल्यानंतर अनुष्का- विराटने प्लॅन केलं वेकेशन?

नुकताच विराट कोहलीचा आरसीबी संघ आयपीएलमधून बाहेर पडला. पण या सर्वाचा परिणाम विराट कोहली आणि अनुष्का शर्मावर झालेला दिसत नाही.

News18 Lokmat | Updated On: May 6, 2019 09:14 PM IST

IPL मधून RCB बाद झाल्यानंतर अनुष्का- विराटने प्लॅन केलं वेकेशन?

आयपीएलचं हे पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं आहे. नुकत्याच चार टीम पुढील सामन्यांसाठी क्वालिफाइड झाल्या असून त्यातून विराट कोहलीचा आरसीबी संघ बाहेर पडला. पण या सर्वाचा परिणाम विराट कोहली आणि अनुष्का शर्मावर झालेला दिसत नाही. दोघंही नुकतेच वेकेशनला गेल्याचं म्हटलं जात आहे.

नुकतंच दोघांना एअरपोर्टवर पाहण्यात आलं. लवकरच वर्ल्डकपला सुरुवात होणार असल्यामुळे दोघं छोटेखानी वेकेशनला गेले असल्याची चर्चा सध्या बी- टाउनमध्ये सुरू आहे.

दोघांनीही यावेळी कॅज्युअल कपड्यांना प्राधान्य दिलं होतं. अनुष्काने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि बेज रंगाची पॅन्ट घातली होती. तर विराटने करड्या रंगाचं टी- शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. अनुष्काने फोटोग्राफर्सकडे पाहून स्मितहास्य तरी केलं पण विराटने कॅमेऱ्याकडे पाहण्याची तसदीही घेतली नाही.

Loading...

यंदाच्या आयपीएलमध्ये गाशा गुंडाळावा लागल्यामुळे विराटने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्याने म्हटलं की पुढच्या वर्षी आरसीबीची टीम अधिक चांगली तयारी करून येईल. लाजिरवाण्या पराभवानंतर वेकेशनला जाणं विराटसाठी आवश्यकच आहे. विराट आणि अनुष्का गुडगावला जाण्याची शक्यता आहे. कारण येत्या १२ तारखेला विराट तिथूनच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.

सध्या विराटसमोर वर्ल्डकप असला तरी अनुष्का मात्र मोकळीच आहे. दरम्यानच्या काळात तिने एकही सिनेमा साइन केलेला नाही. ती अनेकदा विराटसोबत त्याचे सामने पाहताना आणि त्याला पाठिंबा देताना दिसते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2019 09:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...