'विरानुष्का'ने घेतली पंतप्रधानांची भेट, रिसेप्शनचं दिलं निमंत्रण

'विरानुष्का'ने घेतली पंतप्रधानांची भेट, रिसेप्शनचं दिलं निमंत्रण

"दिल्लीत उद्या 21 डिसेंबरला ग्रँड रिसेप्शन होणार आहे. यासाठी आज विरानुष्काने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली "

  • Share this:

20 डिसेंबर : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा इटलीमध्ये विवाहबंधनात अडकल्यानंतर भारतात दाखल झाले आहे. आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन दिल्लीत होणाऱ्या रिसेप्शनचं निमंत्रण दिलंय.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा  मागील आठवड्यात 11 डिसेंबरला इटलीमध्ये 'एक दुजे की' शपथ घेत लग्नबेडीत अडकले. मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत विरानुष्का बोहल्यावर चढले. इटलीत विरानुष्काने आपल्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन दिल्ली आणि मुंबईत आयोजित केले आहे. दिल्लीत उद्या 21 डिसेंबरला ग्रँड रिसेप्शन होणार आहे. यासाठी आज विरानुष्काने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांना रिसेप्शनचं निमंत्रण दिलंय. पंतप्रधान मोदींनी नव दाम्पत्याला आशिर्वाद देत रिसेप्शनचं आमंत्रण स्विकारलं आहे. पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधान मोदी आणि विरानुष्काच्या भेटीची माहिती टि्वटरवर दिलीये.

विशेष म्हणजे, मध्यप्रदेशचे भाजपचे आमदार पन्नालाल शाक्य  यांनी विरानुष्काने देशाबाहेर लग्न केलं म्हणून राष्ट्रभक्तीवर संशय व्यक्त केला होता. तुम्ही देशासाठी खेळतात आणि देशाबाहेर लग्न करतात हा देशद्रोह आहे अशी टीका केली होती.

First published: December 20, 2017, 9:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading