बेस्ट गणपती डान्स म्हणून हा व्हिडिओ कदाचित तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचला असेल. बेफाम नाचणाऱ्या एका स्कूलगर्लचा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिला असेल. कालपासून या शाळेच्या युनिफॉर्ममधल्या मुलीचा एक डान्स व्हीडिओ व्हायरल होतोय. धम्माल नाचणारी ही शाळकरी मुलगी कोण आहे माहितीये? ती आहे मुंबईची मराठमोळी मुलगी. दित्या भांडे. तिनेच या व्हिडिओमागचं रहस्य Network18शी बोलताना उलगडलं. हिपहॉप डान्ससाठी प्रसिद्ध नालासोपाऱ्याला दित्या राहते आणि हा तिच्या नुकत्याच रीलिज झालेल्या तमीळ फिल्ममधला सीक्वेन्स आहे.
या व्हीडिओतली मुलगी शोधताना आम्हाला या डान्समागचं सत्यही उलगडलं आणि समजलं हा गणपतीपुढे केलेला डान्स नाहीच.
हा व्हीडिओ गणपती डान्सचा नसून एका कुट्टू डान्स नावाचा तमीळ नृत्यप्रकार आहे. हा व्हायरल व्हिडिओ कुठून आला याचा शोध घेत असताना हा लक्ष्मी नावाच्या तमीळ सिनेमातला सीन असल्याचं समजलं. सिनेमात हा डान्स अंत्ययात्रेच्या सीनमध्ये येतो. या सिनेमातली ही मुलगी इतकी नृत्यवेडी असते की, म्युझिक वाजलं की नाचायला लागते अगदी फ्युनरल म्युझिकवरसुद्धा नाचते, असा हा सीन आहे.
दित्या भांडेची कमाल
ही धम्माल, बेफाम नाचणारी ही चिमुरडी आहे मराठमोळी दित्या भांडे. हिपहॉप डान्ससाठी प्रसिद्ध नालासोपाऱ्याचीच आहे ही दित्या. रिअॅलिटी शोनंतर तमीळ सिनेमात काम करण्याची संधी मिळालेल्या दित्यानेच News18Lokmat वेबला याबाबची माहिती दिली.
सुपर डान्सर हा रिअॅलिटी शो गाजवल्यानंतर दित्याला लक्ष्मी नावाचा तमीळ सिनेमा मिळाला आणि थेट प्रभुदेवाबरोबर काम करण्याची संधी तिला या सिनेमात मिळाली.
तमीळ आणि तेलुगू अशा दोन्ही भाषेतल्या या सिनेमाला दक्षिणेत चांगलं यश मिळालं आहे. डान्सचा बादशहा प्रभुदेवाबरोबर काम करताना खूप शिकायला मिळालं. "लिजंडबरोबर काम करताना एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं", असं दित्या Network18 शी बोलताना म्हणाली.
मुंबईच्या सेंट फ्रान्सिस डिस्सी स्कूलमध्ये सातवीला शिकणारी दित्या चेन्नईहून Network18शी बोलत होती. एका अॅवॉर्ड फंक्शनमध्ये डान्स परफॉर्मन्ससाठी ती सध्या चेन्नईत आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर इथे हा व्हिडिओ व्हायरल झाल्याबद्दल तिला फारशी कल्पना नव्हती.
दित्याने नाल्यासोपाऱ्यात प्रशांत दळवी यांच्याकडून नृत्याचे धडे घेतले. अजूनही ती त्यांच्याकडे शिकते आहे. 'प्रभुदेवा हे माझं डान्स इन्स्पिरेशन होते. त्यांच्याबरोबर तर काम करायला मिळालं. स्कॉट फॉरसिथ हे माझं आणखी एक मोठं प्रेरणास्थान आहे', दित्या सांगते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: School, Viral video.