व्हायरल होतोय या 6 मुलींचा व्हिडिओ, आतापर्यंत २५ लाख लोकांनी पाहिला

व्हायरल होतोय या 6 मुलींचा व्हिडिओ, आतापर्यंत २५ लाख लोकांनी पाहिला

'द ग्रेट गँबलर' सिनेमातील हे गाणं आशा भोसले यांनी गायलं असून आर.डी. बर्मन यांनी या गाण्याला संगीत दिलं होतं.

  • Share this:

मुंबई, 27 मे- बॉलिवूडमध्ये 1979 मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट 'द ग्रेट गँबलर' सिनेमा आजही कोणी विसरला नसेल. हा सिनेमा जेवढा हिट झाला होता तेवढीच या सिनेमातली गाणीही सुपरहिट होती. आजही अनेक प्रसंगांमध्ये या सिनेमातली गाणी ऐकू येतात. अमिताभ आणि झीनत अमान यांच्यावर चित्रीत झालेलं 'दो लफ्जों की है दिल की कहानी' हे गाणं आजही तेवढंच प्रसिद्ध आहे. आजही नव्या दमाचे गायक हे गाणं आपल्या पद्धतीने नव्या चालीने गाऊन अजरामर करण्याचा प्रयत्न करत असतात तर दुसरीकडे सोशल मीडियावर सहा मुलींनी या गाण्यावर चक्क बेली डान्स केला आहे. या व्हिडिओची विशेष गोष्ट म्हणजे सर्व मुली एकाच तालावर बेली डान्स करत आहेत.

करण जोहर सांगतो, ‘कोणासोबत सेक्स करायचं’; रंगोलीच्या आरोपांनी बॉलिवूडकरांची उडाली झोप

'द ग्रेट गँबलर' सिनेमातील हे गाणं आशा भोसले यांनी गायलं असून आर.डी. बर्मन यांनी या गाण्याला संगीत दिलं होतं. तसेच आनंद बक्शी यांनी या गाण्याचे बोल लिहिले होते. या सिनेमात अमिताभ यांनी पोलीस अधिकारी (विजय) आणि जुगारी (जय) दुहेरी भूमिका साकारली होती.

शाहरुखच्याआधी सलमाननेच घेतला असता मन्नत बंगला, पण...

गेल्या वर्षी पायल डान्स अकादमीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून अपलोड केलेल्या या व्हिडिओला चांगले व्ह्यूज मिळाले आहेत. एकीकडे बॉलिवूड आणि भोजपुरी गाण्यांना लाखोंमध्ये व्ह्युज मिळत असताना हा व्हिडिओ २५ लाखांहून जास्त लोकांनी पाहिला आहे. या चॅनलवर डान्सचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत, पण तरीही या डान्सला सर्वात जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

फक्त एकच सिनेमा करून या अभिनेत्रीने विकत घेतला 8 रूमचा फ्लॅट

First published: May 27, 2019, 12:57 PM IST

ताज्या बातम्या