मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Viral Video : 'वेलेंटाइन डे'साठी उंदीर लागला कामाला, गर्लफ्रेंडसाठी थेट दुकानातून चोरला हार

Viral Video : 'वेलेंटाइन डे'साठी उंदीर लागला कामाला, गर्लफ्रेंडसाठी थेट दुकानातून चोरला हार

हार पळवताना उंदीर

हार पळवताना उंदीर

चोरीचा असा प्रकार तुम्ही कधीच पाहिला नसणार, हे Video कैद झालं नसतं, तर विश्वास ठेवणं देखील कठीण

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 07 फेब्रुवारी : डायमंड ज्वेलरी खूप महाग असते. ती सोन्याच्या दागिन्यांपेक्षाही महाग असते. त्यामुळे चोरी होण्याची शक्यता जास्त असते. चोरी होऊ नये, यासाठी दुकानाचे मालक विशेष काळजी घेतात. सिक्युरिटी गार्ड तर असतातच, शिवाय सीसीटीव्ही कॅमेरेही लावले जातात. महागड्या दागिन्यांच्या दुकानांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येते. दुकानात चोरी होऊ नये, यासाठी दुकानदार सुरक्षेचे सर्व पर्याय अवलंबतात, तरीही अनेक चोरटे चोरी करण्यात यशस्वी ठरतात. अशीच एक चोरी अलीकडेच झाली; मात्र त्यात चोर माणूस नाहीये.

    चोर म्हटलंय म्हणजे तो माणूसच असेल असं नाही. उंदीरही महागडा नेकलेस चोरी करू शकतो. सोशल मीडियावर नेकलेस चोरीचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी राजेश हिंगणकर यांनी ट्विटरवर शेअर केला आहे, त्यामध्ये एक उंदीर नेकलेस डिस्प्लेवर फिरताना आणि मग चोरी करताना दिसतो.

    हे ही पाहा : नोरा फतेहीच्या गाण्यावर चिमुकल्याचा असा डान्स, Video पाहून अभिनेत्रीला फुटेल घाम

    व्हायरल व्हिडिओमध्ये एक उंदीर नेकलेस डिस्प्लेजवळ येतो, तिथे जरा वेळ थांबतो आणि इकडे तिकडे बघतो. थोडा वेळ त्या दागिन्यांभोवती फिरतो आणि मग तो नेकलेस तोंडात धरून उडी मारून पळून जातो.

    व्हिडिओ शेअर करताना आयपीएस अधिकारी राजेश हिंगणकर यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे, की "आता हा उंदीर डायमंड नेकलेस कुणासाठी घेऊन गेला असेल?" या घटनेवर सोशल मीडिया युझर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

    अनेक जण हा व्हिडिओ पाहून खूप हसत आहेत. काहींनी गमतीशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युझरने कमेंट बॉक्समध्ये लिहिलं की, “उंदराच्या मॅडमना लग्नाला जायचं असेल आणि हा इथेच काम करतो, तर त्याने एक हार आणावा, अशी मागणी केली असेल, त्यामुळे त्याने हा नेकलेस नेला.” त्यावर दुसऱ्या युझरने लिहिलं आहे, की, “त्याची पत्नी रोज हार मागत असेल. मी आल्यापासून तू माझ्यासाठी सोन्याचा नवा हार कधीच आणला नाहीस, जा आणि आज घेऊन ये, मग बिचारा उंदीर इथे पोहोचला आणि हा डायमंड नेकलेस घेऊन गेला असावा. "काहींनी तर असं  देखील म्हटलं आहे की वेलेंटाइनची तयारी असावी.''

    हा व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरत नाहीये. आता चोरी झालेला तो हार उंदीर कुठे घेऊन गेला, हा व्हिडिओ कुठला आहे, दुकानमालकाने चोरी झाल्याचं पाहिल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी काय केलं, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही; पण एका लहानशा उंदराने एवढा महागडा नेकलेस चोरल्याचा हा व्हिडिओ सध्या लक्ष वेधून घेत आहे.

    First published:

    Tags: Social media, Top trending, Videos viral, Viral