ज्या मालकावर प्रेम केलं त्यानंच दिला धोका, गाडीला बांधून श्वाला 2 किमी फरफटत नेलं

ज्या मालकावर प्रेम केलं त्यानंच दिला धोका, गाडीला बांधून श्वाला 2 किमी फरफटत नेलं

निर्दयीपणाचा कळस! गाडीला बांधून श्वानाला 2 किमी फरफटत नेलं

  • Share this:

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : माणुसकी संपली का असा प्रश्न कधी कधी प्राण्यांवर होणाऱ्या अन्यायाकडे बघून पडतो. केरळमध्ये एका गरोदर हत्तीणीला स्फोटकं खायला घातल्याच्या घटनेनंतर पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका श्वानाला कारच्या मागे बांधून 2 किलोमीटर फरफटत नेल्याचा प्रकार उघडकीस आला. जखमी झालेला श्वान आपला जीव वाचवण्यासाठी विव्हळत होता मात्र कार चालकाला जराही दया आली नाही. ही धक्कादायक घटना केरळमधील एर्नाकुलम इथे घडल्याचं सांगितलं जात आहे.

या मुक्या जीवाला सुरुवातीला आपल्यासोबत काय होतं आहे याची जाणीव होत नाही. श्वान आपली जीव मुठीत घेऊन पळून जाण्याचे प्रयत्न करतो. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कार चालक सुसाट गाडी पळवतो. या संपूर्ण घटनेत श्वान अत्यंत गंभीर जखमी झाला आणि रक्तबंबाळही. युसूफ नावाच्या तरुणानं हा भयंकर प्रकार केला आहे. तो आपल्या या श्वानावर खूप नाराज होता. त्यामुळे त्यानं हे पाऊल उचल्याची चर्चा आहे.

हे वाचा-रिटायर्ड अधिकाऱ्याच्या खात्यातून 40 लाखांची चोरी; थेट पंतप्रधानांकडे केली तक्रार

एका तरुणानं या घटनेचा व्हिडीओ तयार केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. हा घटनेप्रकरणी त्यानं युसूफला जाब विचारला असता त्याच्या अंगावर ओरडला आणि अर्वाच्च भाषा वापरू लागला. श्वान मेला तर तुझं काय जातंय? असा उलट प्रश्न देखील त्यानं केला.

तरुणानं दिलेल्या माहितीनुसार कारच्या मागच्या बाजूला श्वानाला दोरीनं बांधून त्याला फरफरट नेलं जात होतं. रक्तबंबाऴ श्वाव विव्हळत होता मात्र त्याची सुटका करण्यासाठी कोणी आलं नाही. कोचि इथल्या एका NGO ला याची माहिती मिळाली. त्यांनी पोलिसांच्या मदतीनं युसूफला अटक केली असून श्वानाला रेस्क्यू केलं. सध्या या श्वानावर उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 13, 2020, 3:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या