स्विमिंग पुलमध्ये बुडणाऱ्या तरुणीचा कुत्र्याने वाचवला जीव, VIDEO व्हायरल

बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन यांनीदेखील या व्हिडिओची स्तुती केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2019 04:37 PM IST

स्विमिंग पुलमध्ये बुडणाऱ्या तरुणीचा कुत्र्याने वाचवला जीव, VIDEO व्हायरल

मुंबई, 22 ऑगस्ट : कुत्र्यांना सगळ्यात प्रामाणिक प्राणी मानलं जातं. याच वाक्याला खरं करत कुत्र्याने असं काही कृत्य केलं आहे की ते वाचल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. या संदर्भातला एक व्हिड़िओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कुत्रा एका पाण्यात बुडणाऱ्या महिलेला वाचवतो. सोशल मीडियावर या व्हिडिओला तब्बल 1 मिलियन लोकांनी पाहिलं आहे. या व्हिडिओ नेटकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद दिला गेला आहे. हजारो लोकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. बरं इतकंच नाही तर चक्क बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन यांनीदेखील या व्हिडिओची स्तुती केली आहे.

19 ऑगस्टला एंड्यू एल्बर्ट या ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला. त्यावेळी त्याने लिहलं की, 'तुमच्याकडे जर जर्मन शेफर्ड असेल तर तुम्हाला कोणा लाईफगार्डची गरज नाही.' 25 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने महिला पाण्यामध्ये बुडण्याचं नाटक करते. ते पाहिल्यानंतर तिला वातवण्यासाठी लगेच पाण्यात उडी घेतो. तो महिलेच्या केसांना पकडतो आणि तिला ओढत स्विमिंग पुलच्या कडेला आणतो.

Loading...

मोठ्या हुशारीने कुत्र्याने महिलेचे प्राण वाचवले आणि तिला स्विमिंग पुलच्या बाहेर आणलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून या कुत्र्याचं कौतुक होत आहे. 3 दिवसामध्ये या व्हिडिओला 1.3 मिलियन लोकांनी पाहिलं आहे. 95 हजार लाईक्स आहेत तर 22 हजाराहून जास्त या व्हिडिओला रि-ट्वीट करण्यात आलं आहे. या कौतुकामध्ये अमिताभ बच्चनदेखील सामिल आहेत.

VIDEO : राज ठाकरेंची चौकशी कशासाठी आणि काय कोहिनूर प्रकरण?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 22, 2019 04:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...