7 वर्षांच्या परीनं मारला हेलिकॉप्टर शॉट, VIDEO पाहून चाहत्यांना आली धोनीची आठवण

7 वर्षांच्या परीनं मारला हेलिकॉप्टर शॉट, VIDEO पाहून चाहत्यांना आली धोनीची आठवण

या व्हिडीओला 6.9 हजारहून लाईक्स आणि 700 हून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 14 ऑगस्ट: हेलिकॉप्टर शॉट म्हणलं की क्रिकेटप्रमींच्या तोंडावर नाव येतं ते महेंद्रसिंग धोनीचं. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा हेलिकॉप्टर शॉट पाहण्यासाठी चाहते वेडे होतात. अनेकांनी धोनीच्या या शॉटची कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. काहींना बऱ्यापैकी जमला तर काही जण फेल झाले मात्र तरीही प्रयत्न करत राहतात. 7 वर्षांच्या मुलीनं क्रिकेट खेळताना जबरदस्त हेलिकॉप्टर शॉट मारला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या मुलीनं जो बॉल टोलवला आहे तो पाहून अनेक जण तिचे फॅन झाले आहेत. तर तिने मारलेल्या हेलिकॉप्टर शॉटमुळे अनेक युझर्सना हा व्हायरल व्हिडीओ पाहून धोनीची आठवणही आली. या 7 वर्षांच्या मुलीची सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चा सुरू आहे.

हे वाचा- 'दिमाग खा गई...!' Alexa बरोबर झालं दिलजित दोसांझचं असं भांडण, पाहा VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार या चिमुकलीचं नाव परी शर्मा असं आहे. हरियाणातील रोहतक इथे राहणाऱ्या या मुलीचा घरात क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ आकाश चोपडा, माजी क्रिकेटर संजय मांजरेकर, इंग्लंड टीमचे माजी कर्णधार नासिर हुसैन, माइकल वॉन यांच्यासह अनेकांनी शेअर केला आहे. या व्हिडीओला 6.9 हजारहून लाईक्स आणि 700 हून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. परी शर्माच्या हेलिकॉप्टर शॉटची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 14, 2020, 1:28 PM IST

ताज्या बातम्या