नवी दिल्ली, २८ फेब्रुवारी २०१९- पुलावामा येथे भारतीय जवानांवर केलेल्या हल्लानंतर भारताने जशास तसं उत्तर देत एअर स्ट्राइक केलं. या हल्ल्यात भारताने जैश-ए-मोहम्मदच्या ३०० हून जास्त दहशतवाद्यांना ठार केले. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही त्यांचा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला. यात बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानेही भारतीय लष्कराचं कौतुक करणारं ट्वीट केलं. तिच्या या ट्वीटनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीने प्रियांकावर टीका केली आहे.
पाकिस्तानी अभिनेत्री अर्मीना खानने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने केलेल्या ट्वीटवर टीका केली आहे. भारत- पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावात २६ फेब्रुवारीला प्रियांका चोप्राने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ‘'Jai Hind #IndianArmedForces’ असं ट्वीट केलं. प्रियांकाचं हे ट्वीट रीट्वीट करताना अर्मीना म्हणाली की, तू तर युनीसेफची गुड विल अम्बेसिडर आहेस.
Jai Hind #IndianArmedForces 🇮🇳 🙏🏽
— PRIYANKA (@priyankachopra) February 26, 2019
WHAT?!!! But aren’t you supposed to be a Good Will ambassador for @UNICEF? Screen shot this everyone and next time she speaks up for peace and goodwill. Let’s remind her of this hypocrisy. https://t.co/Jew88bMtYv
— Armeena Khan (@ArmeenaRK) February 26, 2019
अर्मीनाने पुढे लिहिले की, या ट्वीटचा स्क्रीनशॉट घ्या आणि जेव्हा प्रियांका अमन आणि शांतीबद्दल बोलेल तेव्हा तिला या ट्वीटची आठवण करून द्या. यावेळी तिने प्रियांकाला खोटारडीही म्हटले. अर्मीनाने सांगितले की प्रियांका युद्धाला पाठिंबा देते.
काहींच्या मते, प्रियांकाच्या या ट्वीटनंतर युनीसेफ तिला गुडवील अम्बेसिडर म्हणून काढतील. गेल्या दोन- तीन दिवसांपासून भारत- पाकिस्तानमधील तणाव वाढत चालले असताना पाकिस्तानी कलाकार भारत विरोधी पोस्ट शेअर करत आहेत. यात बिग बॉस ४ मध्ये स्पर्धक असलेली वीणा मलिक सर्वात पुढे आहे. ती सतत ट्वीट करून भारतीय लष्कर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिथवण्याचा प्रयत्न करत आहे.
SPECIAL REPORT : लादेनसारखाच मसूदचा पण होईल का खात्मा?